AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवस्त्र झोपतात, नको ते चाळे करतात..; वांद्र्यातल्या घटनेविषयी मोठ्या दिग्दर्शकाची संतप्त पोस्ट

कार्टर रोडवरील स्केटबोर्ड पार्कबाबत त्यांनी केलेल्या पोस्टमुळे सार्वजनिक जागांची सुरक्षितता आणि मुलांसाठी पोषक वातावरण राखण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणाची दखल मुंबई पोलिसांनीही घेतली आहे.

विवस्त्र झोपतात, नको ते चाळे करतात..; वांद्र्यातल्या घटनेविषयी मोठ्या दिग्दर्शकाची संतप्त पोस्ट
Kunal KohliImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 26, 2026 | 10:50 AM
Share

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित सार्वजनिक जागा मिळणं महत्त्वाचं आहे. मात्र, अशाच एका जागेतील कथित गैरप्रकारांमुळे बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी चिंता व्यक्त केली आहे. मुंबईतील वांद्रे इथल्या कार्टर रोड परिसरातील स्केटबोर्ड पार्कमध्ये ड्रग्सशी संबंधित कथित हालचाली सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या ठिकाणी अनेक मुलं येत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत कुणाल यांनी मुंबई पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टमुळे हा विषय चर्चेत आला आहे.

मुलांच्या पार्कमध्ये कथित गैरप्रकार

कुणाल कोहली यांनी मुंबई पोलिसांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटला टॅग करत कार्टर रोडवरील स्केटबोर्ड पार्कमधील परिस्थितीकडे लक्ष वेधलं. काही लोकांचा एक समूह या सार्वजनिक जागेत कथितरीत्या अमली पदार्थांचा वापर आणि विक्री करत आहे. त्यामुळे पार्कमध्ये येणाऱ्या मुलांसाठी आणि इतर नागरिकांसाठी अडचणी निर्माण होत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. या परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करताना कुणाल यांनी संबंधित समूहाच्या वर्तनावरही प्रश्न उपस्थित केले. काही लोक सार्वजनिक ठिकाणी कपडे न घालता झोपतात, तसंच इतरांना सांगताही येणार नाहीत अशा अनुचित कृती करतात, असा दावा त्यांनी केला. मुलांसाठी असलेली ही जागा अशा कथित गैरप्रकारांपासून मुक्त करावी, अशी विनंती त्यांनी पोलिसांना केली आहे.

कुणाल कोहली यांचं ट्विट-

मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी

सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थांशी संबंधित कथित हालचाली होत असतील, तर त्याची चौकशी होणं आवश्यक आहे. विशेषतः लहान मुलं आणि कुटुंबं नियमितपणे येत असलेल्या ठिकाणी सुरक्षित वातावरण राखण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. याच मुद्द्यावर भर देत कुणाल कोहली यांनी संबंधित प्रकरणात अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या पोस्टवर मुंबई पोलिसांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘वांद्रे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही याबद्दलची माहिती दिली आहे’, असं उत्तर पोलिसांनी दिलं.

कुणाल कोहली हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हम तुम’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. याशिवाय त्यांनी विविध विषयांवरील चित्रपटांतून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अलीकडील कामांमध्ये 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉबी और ऋषि की लव स्टोरी’ या चित्रपटाचाही समावेश आहे.

Follow Us
SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; जरांगे प्रकरणावरून राऊतांचा....
Sanjay Raut : SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; मनोज जरांगे प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
Bachchu Kadu : मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
संजय राऊतांनी लिहिलं गृहमंत्री अमित शाह यांना पत्र; पत्रास कारण....
Sanjay Raut : संजय राऊतांनी लिहिलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र; पत्रास कारण....
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला लांबणीवर; खटल्याची पुढील तारीख अखेर ठरली
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला लांबणीवर; खटल्याची पुढील तारीख अखेर ठरली
कर्जत-भीमाशंकरमध्ये 32 हजार झाडांवर कुऱ्हाड? विवेकानंद पाटील म्हणाले
Vivekanand Patil : कर्जत-भीमाशंकरमध्ये 32 हजार झाडांवर कुऱ्हाड? विवेकानंद पाटील म्हणाले, शेवटपर्यंत....
कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे आक्रमक; आदित्य ठाकरेही..
Bhimashankar Tree Cutting : कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे आक्रमक; आदित्य ठाकरेही आज करणार पाहणी
इचलकरंजीत कमी दरात PME बस सेवा सुरु; नागरिकांना मोठा दिलासा
Ichalkaranji Bus : इचलकरंजीत कमी दरात PME बस सेवा सुरु; नागरिकांना मोठा दिलासा
गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुती उमेदवार देणार? चर्चांना उधाण
Gokul Election | गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुती उमेदवार देणार? कोल्हापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
खरगेंच्या त्या वक्तव्याने भाजप आक्रमक; मोदींच्या वडिलांबाबतच्या....
Mallikarjun Kharge : खरगेंच्या त्या वक्तव्याने भाजप आक्रमक; मोदींच्या वडिलांबाबतच्या टिप्पणीवर देशभरात आंदोलनं
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...