
नागपूर जिल्ह्यातीललवाडी नगरपरिषद निवडणुकीत पती - पत्नी दोघेही एकाच वेळी नगरसेवक पदावर निवडून आहे आहे. या ऐतिहासिक निकालामुळे शहरात राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

पति हर्षल काकडे उद्धवसेनेकडून प्रभाग क्रमांक 4 मधून विजयी तर त्यांच्या पत्नी पूर्वा हर्षल काकडे ही अपक्ष प्रभाग क्रमांक 7 (ब) मधून विजयी झाल्या आहेत... त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्या आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे.

निवडून आल्यानंतर, ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षल काकडे यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहे. काँग्रेसने नागपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा धोका दिला... असं हर्षल काकडे म्हणाले.

वाडी नगरपरिषद निवडणुकीत काकडे दाम्पत्याला निवडणून आणलं. काम करणाऱ्यांना संधी द्यावी असा स्पष्ट संदेश जनतेने दिलाय.... तर काकडे दाम्पत्याच्या विजयानंतर वाडी नगरपरिषदेच्या राजकारणात नवे राजकीय समीकरण आकारास आले..

त्यामुळे विरोधकांसाठी हा निकाल आत्मपरीक्षणाचा तर सत्ताधाऱ्यासाठी जबाबदारी वाढणारा ठरला आहे.. पती - पत्नी एकाचवेळी नगरसेवक म्हणून निवडून आल्याने ते जनतेचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरले आहेत.