अतिक्रमण पथक आक्रमक, या भागातील अवैध बांधकामावर फिरवला बुलडोजर

नागपूर शहरात काही ठिकाणी अवैध बांधकाम करण्यात आले. तसेच रस्त्यांवर अतिक्रमण करण्यात आले. असे अतिक्रमण हटवण्याचे काम नागपूर मनपा प्रशासनाने केले आहे.

| Updated on: Apr 14, 2023 | 1:49 PM
1 / 5
मनपा प्रवर्तन विभाग आणि पोलीस विभागातर्फे लक्ष्मी नगर झोन क्र. १ अंतर्गत अतिक्रमण कारवाई  करण्यात आली. आठ रस्ता चौक ते लंडन स्ट्रीट ते दीक्षाभूमी ते जयताळा ते हिंगणा टी पॉइंटपर्यंत अतिक्रमण हटवण्यात आले. यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूवरील रोड आणि फूटपाथवर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले आणि दुकान हटवण्यात आले.

2 / 5
धरमपेठ झोन क्र. २  अंतर्गत गांधी नगर पुष्पराज अपार्टमेंट येथील श्री. पिंजरकर, राजू भाविक आणि सुनील भाविक यांनी अवैध पद्धतीने बांधकाम केले आहे. त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५३ (१) अंतर्गत झोनद्वारे नोटीस दिली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये अवैध पद्धतीने बांधण्यात आलेल्या ४ भिंती तोडण्यात आल्या.

3 / 5
धंतोली झोन क्र. ४ अंतर्गत घट रोड येथील रम्मा अरुण खन्ना आणि रतीश सुरेंद्र खन्ना यांचे दुकान अत्यंत शिकस्त झाले होते. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम २०१२  च्या कलम २६४ अंतर्गत झोनद्वारे नोटीस दिली होती. त्यानुसार परत कारवाई करण्यात आली. यामध्ये अत्यंत शिकस्त झालेले दुकान तोडण्यात आले.

4 / 5
सतरांजीपुरा झोन क्र. ७ अंतर्गत दही बाजार पुलीया ते भंडारा रोडपर्यंत अतिक्रमण हटावची कारवाई करण्यात आली. यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूवरील रोड आणि फूटपाथवर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले आणि दुकान हटवण्यात आले. ही कारवाई उपायुक्त अशोक पाटील, अधीक्षक  संजय कांबळे, यांच्या मार्गदर्शनात विनोद कोकरदे, कनिष्ठ अभियंता भास्कर माळवे आणि अतिक्रमण पथकाद्वारे करण्यात आली.

5 / 5
आशी नगर झोन क्र. ९ अंतर्गत वैशाली नगर ते NIT ऑफिस ते मेहंदी बाग रोड ते दुर्गावती चौक ते परत मेहंदी बाग रोड ते अशोक चौक ते कमाल चौक ते आवळे बाबू चौकपर्यंत अतिक्रमण हटावची कारवाई करण्यात आली. यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूवरील रोड आणि फूटपाथवर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले आणि दुकान हटवण्यात आले.