नागपूरची महिला अखेर पाकिस्तानातून परतली, काय घडलं तिच्यासोबत?; कुणाला भेटली?

नागपूरची सुनीता जामगडे यांना पाकिस्तानी प्रशासनाने भारतात परत पाठवले आहे. ती 17 मेपासून बेपत्ता होती. तिने नियंत्रण रेषा (LoC) बेकायदेशीरपणे ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला होता. तिच्या 12 वर्षाचा मुलाला कारगिलमध्ये एकटी सोडून ती पाकमध्ये गेली होती. बीएसएफ आणि पाकिस्तान रेंजर्सच्या ध्वज बैठकीमुळे तिचं परतणं शक्य झालं.

| Updated on: May 27, 2025 | 11:20 AM
1 / 6
हेरगिरी करणारी ज्योति मल्होत्रा अटकेत असतानाच महाराष्ट्रातील नागपूरमधील महिलेचीही चर्चेत आली होती. सुनीता जमगडे नावाची ही महिला 17 मे पासून नियंत्रण रेषेजवळून (LoC) बेपत्ता झाली होती.

2 / 6
मात्र एलओसी ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या सुनिता हिला आता पाकिस्तानी प्रशासनाने भारताच्या ताब्यात दिले आहे. त्यामुळे ती भारतात परतली आहे.

3 / 6
नागपूरची 43 वर्षीय सुनीता जामगडे ही महिला जम्मू-काश्मीरमधील कारगिलजवळील हंदरमन गावातून बेकायदेशीरपणे पाकिस्तानात घुसली होती, असे पोलिसांनी सांगितलं.

4 / 6
 भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषा बेकायदेशीरपणे ओलांडून तिन पाकिस्तानात प्रवेश केला होता.  सुनीता तिच्या 12  वर्षांच्या मुलाला कारगिलमधील एका स्थानिक हॉटेलमध्ये एकटी सोडून गेली होती

5 / 6
ही महिला एका ख्रिश्चन धर्मगुरूला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेली होती असे प्राथमिक तपासात समोर आलं.

6 / 6
अखेर पाकिस्तान रेंजर्सनी सुनीताला बीएसएफकडे सोपवले, त्यानंतर बीएसएफने तपास करुन तिला अमृतसर पोलिसांच्या ताब्यात दिले. बीएसएफ आणि पाकिस्तान रेंजर्समधील ध्वज बैठकीमुळे या महिलेचे परत येणे शक्य झाले