Nana Patekar: रात्री साडेतीन वाजता भावासमोर… दीड महिन्यांनी समोर आली नाना पाटेकरांच्या मृत्यूची दुसरी बाजू
Nana Patekar: बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाला दीड महिना झाला आहे. त्यानंतर आता त्यांच्या जवळचा मित्र महेश मांजरेकर यांनी 8 ऑक्टोबर रोजी नेमकं काय घडलं होतं? हे सांगितलं आहे.

मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे 8 ऑक्टोबर रोजी गोव्यातील घरात निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. आता नाना पाटेकर यांच्या निधनाची दुसरी बाजू त्यांच्या जवळचे मित्र महेश मांजरेकर यांनी सांगितली आहे. नेमकं काय घडलं होतं? वाचा...
महेश मांजरेकर यांनी नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी नाना पाटेकर यांच्यासोबत 8 ऑक्टोबर रोजी नेमकं काय घडलं होतं? हे सांगितलं आहे. "मी नानाला मिठी मारून शिवी घातली असती. हे खरंच निष्पक्ष आहे. माझी माझी फाईट असते. आम्ही एकमेकांना शिव्या घालूनच बोललो आहे. आजही शिव्या घालेन ही हे योग्य नाही. तू गेला हे योग्य नाही. तुला हक्क नव्हता जायचा आणि असा... म्हणजे मी नसताना... काहीही.. म्हणजे आजारी पड रे.. आम्ही आलो असतो कुठेही आलो असतो."
पुढे ते म्हणाले की, "कधीच न मरणारा वाटणारा माणूस जातो.. मला कधी कधी वाटतं की माणसाला थोडं काही तरी आजार असला की बरं असतं. आपण जास्त काळजी घेतो. या माणसाने काळजीच घेतली नाही. रात्री अडीच वाजता जर का तुला अस्वस्थ होतंय तर तू निरोप कसला पाठवतोस? बाजूला राहातो त्याचा भाऊ मिरामारला."
"मग साडेतीनला त्याला सांगितलं की अजूनही बरं वाटत नाही. तू आहेस ना मला काही वाटलं तर सांगतो. बरं तो थोडी थांबणार आहे. तो आला. आला आणि म्हणाला... बरं नानाचं घर आहे तिथून चालत चार मिनिटावर मनीपॉल हॉस्पिटल आहे. देशातील सर्वात चांगल्या हॉस्पिटल पैकी एक आहे ते. तो म्हणाला नाना आपण जाऊ ना डॉक्टरकडे. साडेतीनला हे... बघू.. म्हणजे गॅस आहे असे वाटतंय. वाटलं तर जाऊ हे बोलता बोलता अटॅक आला तिकडे" असे महेश मांजरेकर म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, "पण का नाही गेलास अडीच वाजता? त्याची पण वाट पाहू नकोस तिथून चालत गेला असतास मणीपालला. आता माझी चिडचिड होते, त्याचा त्रास होतो. जर मृत्यूनंतर जीवन असेल, तर माझ्या कुटुंबाव्यतिरिक्त ज्या व्यक्तीला मला सर्वात आधी भेटायला आवडेल, ती म्हणजे नाना."