अंत्यसंस्कारासाठी नदीतून जीवघेणा प्रवास, मरणानंतरही संपल्या नाहीत यातना

देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशकांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाला आहे. परंतु सातपुड्याच्या दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या कमी होत नाही आहे. अंत्यसंस्कारासाठी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींना नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. मृत झालेल्या व्यक्तीचा शेवटच्या प्रवासातही मरण यातना संपत नसल्याचे समोर आले आहे.

| Updated on: Jul 03, 2025 | 12:58 PM
1 / 5
नवापूर तालुक्यातील नेसू नदी पार करून अंत्यविधीसाठी जावे लागते. कारण या नदीवर पूल नाही. या भागातील आदिवासी पाड्यांवरील नागरिकांचे दुर्दैवच म्हणावे लागणार आहे. नदीतील वाहत्या प्रवाहाच्या पाण्यात उतरुन नागरिकांना ही नदी पार करावी लागत आहे.

2 / 5
नवापूर तालुक्यातील शेगवे गावात लोकांना त्यांच्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी नदी पार करावी लागली. धक्कादायक बाब म्हणजे स्मशानभूमीत जाण्यासाठी पूल नाही. तसेच इतर कोणताही दुसरा मार्ग नाही.

3 / 5
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाताना कुटुंबियांनी स्वत:चा जीव धोक्यात घालावा लागत आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्याने लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

4 / 5
नवापूर तालुक्यात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नेसू नदीला पूर आला आहे. पुला अभावी नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून त्या पुराच्या पाण्यातून मृतदेह घेऊन अंत्यविधी करावा लागत आहे.

5 / 5
मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे व इतर साहित्य नेण्यासाठी मोठी कसरत लोकांना करावी लागते. हे साहित्य नेण्यासाठी मोठा फेरा मारून जावे लागत आहे. नेहमीच ही समस्या असताना प्रशासनाकडून त्यावर ठोस उपाययोजना केली जात नाही.