
बिबट्या आणि गायीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये बिबट्या एका गायीच्या शेजारी बसलेला दिसत आहे. नेमका का बसला होता? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण गाय तिचं काम करून बसली होती.

ही घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील दोडी गावातील आहे. मोकळ्या शिवारात कचरू आव्हाड यांच्या गोठ्यात त्यांची गाय होती. गोठ्यात कोणीच नव्हतं, याचाच फायदा घेत बिबट्या आतमध्ये घुसला.

बिबट्याला वाटलं आता काय आहे आयती शिकार भेटली, पण उलटाच गेम झाला. जसा बिबट्या आतमध्ये आला तेव्हा गाय सतर्क झाली होती.

जसा बिबट्या आतमध्ये येऊन हल्ला करू लागला तेव्हा गायीने त्याच्यावर लाथा घातल्या. बरं या लाथा अशा होत्या की बिबट्या जागेवरच गपगार झाला.

बिबट्या गोठ्यात एका बाजूला शांत बसला होता. त्यानंतर वनविभागाला कळवल्यावर पथक दाखल झालं आणि त्याला भुलीचं इंजेक्शन देत ताब्यात घेतलं. गायीला मानलं पाहिजे, न घाबरता तिने मोठ्या हिमतीने बिबट्याला लोळवला. जर्सी गायीने बिबट्याला मारल्याची पंचक्रोशीत षीत जोरदार चर्चा आहे.