
काळवीट अडकलेले पाहताच त्यांच्या मागावर असणाऱ्या भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. लचके तोडून या दोघांनाही संपवले.

काळविटांच्या पायांना पाइपचा असा वेढा बसला की, त्यांना जागचे हालताही येत नव्हते. ते आपोआप जेरबंद झाले.

काळविटांच्या मृत्यूची बातमी समजताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने पंचनामा केला.

काळविटांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर चांदवड वनविभाग कार्यालय परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.