
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) मध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. ही भरती प्रक्रिया अभियंता पदासाठी सुरू आहे. विविध पदांसाठी ही भरती पार पडणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही 20 डिसेंबर 2023 पासून अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3 जानेवारी 2024 आहे. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करावेत.

एनटीपीसीमध्ये अभियंता पदांसाठी तब्बल 100 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे एनटीपीसी ही कंपनी भारतामध्ये सर्वाधिक वीज निर्मिती करणारी कंपनी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज हे करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर तुमची निवड केली जाईल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 300 रूपये फिस ही तुम्हाला भरावी लागणार आहे. मग उशीर न करता या भरती प्रक्रियेच्या तयारीला उमेदवारांनी लगेचच लागावे. विशेष म्हणजे 1 लाखांपेक्षाही अधिक पगार काही पदांना मिळणार आहेत.