
राज्यात मुसळधार पाऊस बरसेल अशा इशारा हवामान खात्याने देताच मुंबईसह नवी मुंबई, पनवेल मध्ये पावसाने खरोखरंच हजेरी लावली.

नवी मुंबई , पनवेल या विभागांमध्ये रात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. सुरुवातीला पावसाचा जोर कमी होता पण नंतर मुसळधार पाऊस पडण्यास सुरूवात झाली.

मुसळधार पाऊस आणि लोकल सेवा सामान्यांसाठी बंद असल्याने चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नवी मुंबईसह पनवेल मध्ये जोरदार पाऊस झाल्याने सखोल भागात चांगलंच पाणी साचलं. यामुळे काही ठिकाणी ट्रॅफिक जॅम झालं. रात्रीपासूनच पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं.

सकाळच्या सुमारास कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. रस्त्यावर पाणी असल्याने एकीकडे ट्रॅफिक कोंडी तर दुसरीकडे सर्वसामान्यांना लोकल सेवा बंद असल्याने चाकरमान्यांना मनस्तापाला सामोरं जावं लागले.