Navneet Rana : वडील म्हणाले पती-पत्नीला अक्कल नाही, त्यानंतर राणा दाम्पत्य थेट अडसूळ यांच्या घरी, खास Photos

| Updated on: Apr 17, 2024 | 11:19 AM

Navneet Rana : राजकारणात कधीही, काहीही होऊ शकतं, त्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. अमरावतीमध्ये महायुतीच्या एका नेत्याने आज उमेदवाराची थेट अक्कल काढली. त्यानंतर उमेदवार थेट टीका करणाऱ्या नेत्याच्या घरी पोहोचला.

1 / 5
आनंदराव अडसूळ यांनी आज नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली. त्यांची अक्कल काढली. त्यानंतर राणा दाम्पत्य थेट अडसूळ यांच्या घरी त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलं.

2 / 5
आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर चांगलेच तोंडसूख घेतले. खरंच त्या पती पत्नीला अक्कल आहे की नाही, माझा प्रश्न आहे.नैतिकता नाही, अक्कल नाही.. आटापिटा करून मंडळींनी मला थांबविले आणि तिला उमेदवारी दिली, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

3 / 5
"त्यांच्यात अडाणीपणा आहे. 17 रुपयांच्या साड्या वाटून त्यांची हवा निर्माण झाल्याचा टोला त्यांनी लगावला. नवरा बायकोला बंटी बबली नाव दिली, ती विचारपूर्वक दिल्याचे ते म्हणाले. मी राजकारण सोडेल पण नवनीत राणा यांच्या प्रचाराला जाणार नसल्याचे आनंदराव अडसूळ म्हणाले"

4 / 5
"काही तत्व आहेत माझी, तडजोडी मध्ये काही गोष्टी महायुतीत इच्छेविरुद्ध स्वीकारल्या. महायुतीचे सरकार महत्वाचे आहे, सरकार आले पाहिजे, देशाचे हित महत्वाचे आहे, असे ते म्हणाले. कागदपत्रांवरुन त्यांचे जातप्रमाणात बोगस असल्याचे दिसून येते" असे आनंदराव अडसूळ म्हणाले.

5 / 5
अभिजीत अडसूळ या भेटीनंतर म्हणाले की, "आम्ही भूमिका अजून ठरवलेली नाही. आम्ही सकारात्मक आहोत. कार्यकर्ते, पदाधिकारी बसून सकारात्मक निर्णय घेऊ" शिवसेना-भाजपा युती म्हणून आम्ही ही निवडणूक लढतोय असं त्यांनी सांगितलं.