Navratri 2023 : नवरात्रीत करा बंगाली लूक, या अभिनेत्रींकडून घ्या Inspiration

राणी मुखर्जी स्वतः बंगाली आहे. राणी मुखर्जी तिच्या अनोख्या फॅशन सेन्समुळे ओळखली जाते. राणी मुखर्जीने पांढरी साडी आणि लाल ब्लाउज घातलाय. हा बंगाली लूक तिने खूप छान पद्धतीने कॅरी केलाय. सिंदूर, लाल लिपस्टिक, गळ्यात एक नेकलेस असा हा मिनिमल ज्वेलरी लूक तुम्ही फॉलो करू शकता.

Rachana Bhondave | Updated on: Oct 21, 2023 | 4:14 PM
1 / 5
durga puja outfit

durga puja outfit

2 / 5

हा फोटो बघा. बंगाली लूक आणि काजोलला फॉलो करणार नाही म्हणजे काय? या फोटोत काजोलने पिवळ्या रंगाची साडी नेसलीये, त्यावर एक साधा ब्लाउज आहे. मधून भांग पाडून केस चापून चोपून बांधलेत आणि साडी सुद्धा हलकी आहे. ही साडी कॅरी करणं सोपं आहे. तुम्ही सुद्धा काजोल सारखा असा साधा सोपा लूक करू शकता.

3 / 5

मौनी रॉय ही बंगाली आहे. ही बंगाली अभिनेत्री खूपदा तिच्या वेगवेगळ्या लुक्सने चाहत्यांना घायाळ करत असते. सध्या मौनी रॉयचे फोटो व्हायरल होतायत. नागीण फेम मौनी रॉय, तिने पांढरी साडी नेसलीये, पांढरी साडी आणि लाल बॉर्डर. तुम्ही तिच्यासारखा बंगाली लूक करू शकता.

4 / 5

राणी मुखर्जी स्वतः बंगाली आहे. राणी मुखर्जी तिच्या अनोख्या फॅशन सेन्समुळे ओळखली जाते. राणी मुखर्जीने पांढरी साडी आणि लाल ब्लाउज घातलाय. हा बंगाली लूक तिने खूप छान पद्धतीने कॅरी केलाय. सिंदूर, लाल लिपस्टिक, गळ्यात एक नेकलेस असा हा मिनिमल ज्वेलरी लूक तुम्ही फॉलो करू शकता.

5 / 5

बिपाशा बसू वेस्टर्न लूक मध्येच जास्त चांगली दिसते असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. हा फोटो बघा, या लूकमध्ये अभिनेत्रीने केशरी-गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. बिपाशाचा हा सिम्पल लूक तुम्हीही ट्राय करू शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us