‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये अखेर तो क्षण आलाच; प्रेक्षकांमध्ये प्रपोजलची प्रचंड उत्सुकता

'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. यामध्ये लीलाच्या भूमिकेत अभिनेत्री वल्लरी विराज असून एजेच्या भूमिकेत अभिनेता राकेश बापट आहे. रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Feb 11, 2025 | 9:44 AM
1 / 6
'झी मराठी' वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेच्या कथानकात रंजक वळण आलं आहे. एजेनं प्रपोज करावं म्हणून लीला उपोषणाला बसणार आहे. त्यात तिला सरोजिनीची साथ मिळणार आहे.

2 / 6
लीलाचं उपोषण मोडण्यासाठी एजे तिच्या आवडीचा नाष्टासुद्धा बनवतोय. पण काही केल्या लीला उपोषण सोडत नाही. सुनासुद्धा लीलावर बारीक लक्ष ठेवून आहेत.

3 / 6
शेवटी एजे स्वतः सुद्धा उपाशी राहण्याचा निश्चय करतो, तेव्हा मात्र लीलाचा नाईलाज होतो. पण ती आपल्या म्हणण्यावर ठाम आहे. मला प्रपोज करावंच लागेल, असं ती एजेला म्हणते.

4 / 6
जी गोष्ट अंतरासोबत झाली ती लीलासोबत होऊ नये, अशी भीती एजेच्या मनात आहे. म्हणून तो अंतराच्या फोटोजवळ जाऊन त्याच्या मनातली भीती बोलून दाखवतो. जेव्हा जेव्हा त्याने त्याचं प्रेम व्यक्त केलं तेव्हा ती व्यक्ती त्याच्यापासून दुरावली गेली.

5 / 6
लीलाला त्याला गमवायचं नाहीये. पण लीलाचा हट्ट म्हणून एजे फायनली तिला विचारतो की नक्की तुला कसं प्रपोजल हवं आहे? तेव्हा लीला त्याला एकदम फिल्मी स्टाइल ग्रँड प्रपोजल करून दाखवा असं सांगते.

6 / 6
अशातच किशोर लीलाला जीवे मारण्याचा प्लॅन बनवतोय. त्यासाठी तो एजे आणि लीलाच्या मागे माणसं पाठवतो. आता एजे फिल्मी स्टाईल प्रपोज करू शकेल की खरंच एजेच्या मनातील भीती खरी ठरेल हे मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल.