
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही नेहमीच चर्चेत असते. अमिताभ बच्चन यांच्यासोबत काही दिवसांपूर्वीच नव्या नवेली नंदा ही एका जाहिरातीमध्ये दिसली होती.

नव्या नवेली नंदा ही बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. फॅमिली बिझनेस सध्या नव्या नवेली नंदा ही सांभाळत आहे. सोशल मीडियावर नव्या नवेली नंदा हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

नव्या नवेली नंदा ही सध्या बंगळुरु येथे धमाल करताना दिसत आहे. नव्या नंदा हिने बंगळुरुमधील काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बंगळुरु येथे आपल्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवताना नव्या दिसत आहे. इतकेच नाही तर बंगळुरुमध्ये डोसावर ताव मारताना देखील नव्या नंदा ही दिसत आहे.

बंगळुरुच्या आयआयएम काॅलेजमध्येही नव्या गेली असून तिथे थ्री इडियट्स चित्रपटाची बरीच शूटिंग करण्यात आलीये. आता नव्याचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.