Vikram Kakade Net Worth: राष्ट्रवादीचे विक्रम काकडे यांची संपत्ती किती? थेट जय पवारांनाही 10 कोटींचे दिले कर्ज

Vikram Kakade Net Worth: राष्ट्रवादीचे विक्रम काकडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आल्यानंतर नाराजी नाट्य पाहायला मिळाली. आता विक्रम काकडे यांच्या संपत्तीची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांनी जय पवारांना देखील कर्ज दिल्याचे समोर आले आहे.

| Updated on: Jun 04, 2026 | 11:53 AM
1 / 7
राज्यात सध्या आगामी विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. 17 स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघासाठी चढाओढ सुरु आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उमेदवारांवरुन नाराजी नाट्य पाहायला मिळाली. पुणे विधान परिषद मतदारसंघातून महायुतीकडून ऐन वेळी पक्ष प्रवेश करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आता विक्रम काकडे यांच्या संपत्तीची चर्चा रंगली आहे.

2 / 7
निवडणूक प्रतिज्ञापत्रातून समोर आलेल्या माहितीनुसार, विक्रम काकडे यांच्याकडे सुमारे १५० कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

3 / 7
विक्रम काकडे यांच्याकडे ७८ कोटी ९५ लाख ६५ हजार ५३१ रुपयांची जंगम मालमत्ता, साडेसात लाख रुपयांची रोख रक्कम आणि विविध बँकांमधील २९ लाख ५३ हजार रुपये ठेवी इतकी रक्कम आहे.

4 / 7
तसेच काकडे यांच्याकडे ४१० ग्रॅम सोने, ५ किलोहून अधिक चांदी, आलिशान घड्याळे, महागड्या गाड्या आणि थेट आलिशान बोटी देखील आहेत. बांधकाम क्षेत्रात त्यांची १५ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. तसेच त्यांच्याकडे ५० लाख रुपये किमतीची परवानाधारक हत्यारेही आहेत.

5 / 7
समोर आलेल्या माहितीनुसार, काकडे यांनी जय पवार यांना थेट १० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. इतकेच नाही तर बड्या असामींना आणि कंपन्यांना कोट्यवधी रुपयांची कर्जे दिली आहेत. परवेज ग्रँट यांना २ कोटी १७ लाख रुपये दिले आहेत.

6 / 7
काकडे यांच्याकडे ७४ कोटी ७ लाख रुपयांची, तर त्यांची पत्नी देविका यांच्या नावावर ९ कोटी १९ लाख रुपयांची मालमत्ता आहे.

7 / 7
विशेष म्हणजे विक्रम काकडे यांचे दुबईतही एक आलिशान घर आहे.

Follow Us