नीता अंबानींची आवडती कार कोणती? रंग तर फारच खास, किंमत किती?

अंबानी कुटुंबाचे कार संग्रह जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांच्याकडे १७० पेक्षा जास्त महागड्या कार आहेत, ज्यामध्ये रोल्स रॉयस, मर्सिडीज-बेंझ आणि फेरारीसारख्या प्रसिद्ध ब्रँड्सचा समावेश आहे. या लेखात आम्ही अंबानी कुटुंबाच्या आवडत्या कार आणि त्यांच्या खास वैशिष्ट्यांबद्दल माहिती देणार आहोत.

| Updated on: Aug 25, 2025 | 9:29 AM
1 / 8
अंबानी कुटुंब हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मुकेश अंबानी, हे भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांच्या आलिशान जीवनशैलीची झलक त्यांच्या कार कलेक्शनमधून पाहायला मिळते.

2 / 8
अंबानी कुटुंबियांच्या गॅरेजमध्ये १७० हून अधिक महागड्या आणि खास गाड्या आहेत. ज्यांची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. या गाड्यांमध्ये रोल्स रॉयस, मर्सिडीज, फेरारी यांसारख्या प्रसिद्ध ब्रँड्सचा समावेश आहे. आज आपण अंबानी कुटुंबियांच्या आवडत्या कारबद्दल बोलणार आहोत.

3 / 8
अंबानी कुटुंबाकडे असलेल्या सर्वात महागड्या गाड्यांपैकी ही एक आहे. या बुलेटप्रूफ रोल्स रॉयस कलिननची किंमत सुमारे १७ कोटी रुपये आहे. सुरक्षेला महत्त्व देऊन ही गाडी खास त्यांच्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. यात अत्याधुनिक सुरक्षा फीचर्स असून यामुळे प्रवेश सुरक्षित होतो.

4 / 8
अंबानींच्या गॅरेजमध्ये अनेक मर्सिडीज कार्स आहेत. पण त्यात मर्सिडीज-बेंझ एस ६८० गार्ड ही सर्वात खास आहे. ही देखील एक बुलेटप्रूफ लक्झरी सेडान असून तिची किंमत सुमारे १५ कोटी रुपये आहे.

5 / 8
नीता अंबानी यांची रोल्स-रॉइस फँटम ईडब्ल्यूबी ही आवडती कार आहे. जे एक खास विस्तारित व्हीलबेस मॉडेल आहे. ही गाडी खास त्यांच्या आवडीनुसार रंग आणि कस्टमायझेशनसह तयार केली आहे. तिची किंमत सुमारे १४ कोटी रुपये आहे.

6 / 8
मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आकाश अंबानी त्याच्या फेरारी कारमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर फेरारी चालवताना दिसतो. या आलिशान कारची किंमत १२ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

7 / 8
मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हा रोल्स रॉयस एसयूव्हीचा खूप मोठा चाहता आहे. त्याच्याकडे २०२४ रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक बॅज आहे. ज्याची किंमत १४ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. ही कार स्टाईल आणि लक्झरीचे उत्तम मिश्रण आहे.

8 / 8
या सर्व गाड्यांव्यतिरिक्त, अंबानी कुटुंबाकडे आणखी एक रोल्स रॉयस कलिनन आहे, ज्याची किंमत १३ ते १४ कोटी रुपये आहे. त्यांच्याकडील प्रत्येक गाडी कोट्यवधींची असून ज्यापैकी अनेक कार या बुलेटप्रूफ आणि हाय-टेक सुरक्षा फीचर्स असलेल्या आहेत.