
प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर लग्नबंधनात अडकली आहे. तिनं पंजाबी गायक रोहनप्रीत सिंहसोबत पंजाबी पद्धतीनं 24 ऑक्टोबरला दिल्लीतील गुरुद्वारात लग्नगाठ बांधली.

तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

लग्नाच्या तयारीपासून ते लग्नाच्या सगळ्या फंक्शनचे फोटो नेहा आणि रोहनप्रीत सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

आता या दोघांनी त्यांच्या नाईट वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नेहानं लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे तर रोहनप्रीतनंही लाल रंगाचाच कुर्ता परिधान केला आहे.

नेहा आणि रोहनप्रीत या फोटोमध्ये परफेक्ट कपल गोल्स देत आहेत.


या लाल रंगाच्या लेहंग्यानं नेहाच्या सौंदर्याला चार चाँद लावलेत.