नव्या वर्षाला नवीन घरात प्रवेश करताय? चुकूनही 5 चुका करू नका
नव्या वर्षाला नवीन घरात राहण्यास जात असाल. त्यासाठी गृह प्रवेशाची पूजा करत असाल. तर या चुका करणे टाळाव्या. जाणून घ्या कोणत्या चुका टाळाव्यात.

नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता जवळपास एक महिना बाकी आहे. अनेकांचा नव्या घरात राहायला जाण्याआधी गृह प्रवेशाचा कार्यक्रम करण्याचा प्लान आहे. त्यामुळे नव्या घरात प्रवेश करण्याआधी काही गोष्टी जाणून घ्या .
तुम्ही कोणत्याही घरात प्रवेश करण्याआधी घरात कोणत्याही वस्तू ठेवू नका. वास्तू नियमानुसार नव्या घरात जाण्याआधी शुभ मुहूर्त पूजा करायला विसरू नका. तसेच नव्या घरात एखाद्या देवाची फोटो घेऊन जा.
नवीन घरात फुटलेल्या वस्तू घेऊन जाऊ नयेत. तुम्ही नकळतपणे नव्या घरात फुटलेल्या वस्तू घेऊन जातात, परंतु वास्तू नियमानुसार योग्य नाही. यामुळे घरात नकारात्मकता निर्माण होते. तसेच घरात फुटलेल्या वस्तू ठेवू नये.
तुम्ही गृहपूजा केली असेल. तर तुम्ही अधिक कालावाधीसाठी घर रिक्त ठेवू नका. गृह प्रवेश पूजा केल्यानंतर लवकरात लवकर नव्या घरी राहण्यास जावे. उशिरा राहाण्यास गेल्यास घरात नकारात्मक वातावरण निर्माण होते.
सूचना : लेखातील माहिती वास्तूशास्त्रावर आधारित आहे. तसेच लेखातील माहिती सामान्य माहितीनुसार आहे. आम्ही ही माहिती अचूक असल्याची हमी देत नाही.