PHOTOS: सचिन वाझेंचा लोकल ट्रेनने प्रवास; काय घडलं त्या रात्री?

| Updated on: Apr 06, 2021 | 7:57 AM

सचिन वाझे यांना घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) अधिकाऱ्यांनी सोमवारी मुंबईतील लोकल ट्रेनने प्रवास केला. | Sachin Waze NIA CSMT

1 / 8
अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणातील मुख्य संशयित सचिन वाझे यांना घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री मुंबईतील लोकल ट्रेनने प्रवास केला.

2 / 8
4 मार्च रोजीच्या घटनांचे नाट्यरुपांतरण करण्यासाठी सचिन वाझे यांना छत्रपती शिवाजी महाराज (CSMT) आणि कळवा रेल्वे स्थानकात नेण्यात आले होते.

3 / 8
रात्री साधारण सव्वाअकराच्या सुमारास NIA चे अधिकारी वाझे यांना घेऊन मुंबईतील कार्यालयातून बाहेर पडले. त्यानंतर साडेअकरा वाजता हे सर्वजण सीएसएमटी स्थानकात दाखल झाले.

4 / 8
याठिकाणी फलाट क्रमांक 4 आणि 5 वर सचिन वाझे यांना नेऊन 4 मार्चच्या रात्री काय घडले होते, याची नेमकी माहिती 'एनआयए'च्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.

5 / 8
रात्री 12.15च्या लोकल ट्रेनने NIA ची टीम सचिन वाझे यांना घेऊन कळव्याच्या दिशेने निघाली.

6 / 8
साधारण 12.45 च्या सुमारास लोकल ट्रेन कळव्याला पोहोचली. याठिकाणी उतरल्यानंतर NIAच्या अधिकाऱ्यांनी 30 मिनिटं थांबून 4 मार्चच्या रात्री घडलेल्या घटनांचे नाट्यरुपांतरण (क्राईम सीन रिक्रिएट) केले.

7 / 8
सचिन वाझे एनआयएच्या अधिकाऱ्यांना माहिती देताना.

8 / 8
हे सगळं आटोपल्यानंतर NIAची टीम रात्री सव्वाच्या सुमारास सचिन वाझे यांना घेऊन पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाली. रात्री दोन वाजता हे सर्वजण पुन्हा मुंबई NIAच्या कार्यालयात पोहोचले.