तब्बल 17 कडवे असलेलं गाणं, लेखकाने एकाच… 44 वर्ष जुनी सदाबहार गझल आजही आवडीने ऐकतात लोक

1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘निकाह’ चित्रपटातील एका गझलेने आजही संगीतप्रेमींच्या मनात घर केलं आहे. गुलाम अली यांच्या आवाजातील ही गझल चार दशकांनंतरही लोकप्रिय आहे. या गझलेमागे अनेक रंजक गोष्टी आहेत.

| Updated on: Oct 14, 2026 | 2:40 PM
1 / 5
हसरत मोहानी यांनी ही गझल लिहिली असून, मूळ गझलेत 17 शेर आहेत. चित्रपटासाठी त्यातील काही शेर निवडण्यात आले.

हसरत मोहानी यांनी ही गझल लिहिली असून, मूळ गझलेत 17 शेर आहेत. चित्रपटासाठी त्यातील काही शेर निवडण्यात आले.

2 / 5

गुलाम अली यांच्या सुरेल आवाजामुळे या गझलेला वेगळी ओळख मिळाली. आजही संगीताच्या मैफलींमध्ये या गझलेला विशेष पसंती मिळते.

3 / 5

ही गझल सलमा आगा आणि दीपक पराशर यांच्यावर चित्रित करण्यात आली. तिच्या सादरीकरणामुळे प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप पडली.

4 / 5

बी. आर. चोप्रा यांच्या ‘निकाह’ चित्रपटाचे सुरुवातीचे नाव ‘तलाक तलाक तलाक’ होते. वादानंतर चित्रपटाचे नाव बदलण्यात आले.

5 / 5

‘निकाह’मध्ये राज बब्बर यांचीही महत्त्वाची भूमिका होती. सुमारे 4 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटाने 9 कोटींपेक्षा अधिक कमाई केल्याचे सांगितले जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us