Anushka Sarkate : पप्पा पप्पा काय करते? केवळ चिडवाचिडवीवरून सुरु झालं अन्… निखिल-अनुष्काच्या लग्नाचा किस्सा पुन्हा उलगडला
टीव्हीवरील लोकप्रिय जोडी अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे यांनी काही महिन्यांपूर्वी लग्नगाठ बांधली. झी मराठीवरील 'कारभारी लय भारी' या मालिकेतून त्यांची ओळख झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. नुकत्याच महाराष्ट्र दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रेमाची सुरुवात आणि लग्नापर्यंतचा प्रवास सांगितला.

अनुष्का सरकटे तिच्या वडिलांच्या खूप जवळ आहे. ती म्हणाली, "काहीही झालं तरी माझा पहिला फोन पप्पांना जातो." सेटवरही तिचं सतत वडिलांशी बोलणं सुरू असायचं, यावरून निखिल तिला चिडवायचा.
मालिकेच्या सेटवर दोघांची चांगली मैत्री झाली. फोनवर सतत बोलण्याची त्यांना सवय लागली होती. मात्र, एकमेकांच्या मनातील भावना त्यांनी कधीच व्यक्त केल्या नव्हत्या.
एकदा निखिल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बाहेर गेला असताना अनुष्का फोनवर शांत होती. तेव्हा तिने त्याला विचारलं, "आपण एकमेकांमध्ये गुंतत चाललो आहे का?" या प्रश्नानंतर दोघेही काही वेळ शांत झाले.
अनुष्काने पुढे सांगितले की, ती 22 जणांच्या कुटुंबात वाढली असून वडील सांगतील त्याच मुलाशी लग्न करणार होती. यावर निखिलने तिला म्हटलं, "मी तुला काही लग्नासाठी विचारात नाही... तू शांत हो आधी..."
यानंतर निखिल अनुष्काच्या वडिलांना आणि भावाला भेटला. हळूहळू त्याचे संपूर्ण कुटुंबाशी चांगले संबंध निर्माण झाले. विशेष म्हणजे, निखिलच्या 'डार्लिंग' चित्रपटातील कथानकाप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही आधी वडिलांची मनं जिंकण्याचा प्रसंग घडला.नुकत्याच महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रेमाची सुरुवात आणि लग्नापर्यंतचा प्रवास सांगितला.