


बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' या टीव्ही मालिकेच्या सेटवर गळफास लावून आयुष्य संपवलं. त्यानंतर तिचा को-स्टार शीजान खानला अटक करण्यात आली होती.

बालिका वधू मालिकेने घराघरात पोहोचलेल्या 24 वर्षीय प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूच्या वृत्तामुळे टीव्ही इंडस्ट्रीत मोठी खळबळ माजली होती. 2016 सालच्या एप्रिल महिन्यात तिने तिच्या घरात स्वत:चं आयुष्य संपवलं होतं. प्रोफेशल आयुष्यातील अडचणी आणि वैयक्तिक आयुष्यात बॉयफ्रेंडसोबतचे संबंधही चांगले नसल्याच्या तणावातून तिने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात होतं.

डिसेंबर 2019 मध्ये कुशल पंजाबी या अभिनेत्याचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. कुशल डिप्रेशनमध्ये असल्याने त्याने हे टोकाचे पाऊल गाठत जीवन संपवल्याचे सांगण्यात आले होते. आपलं सर्व सामाना आई-वडील आणि मुलाला देण्यात यावे, असे त्याने नमूद केले होते.

गजनी, निशब्द अशा चित्रपटांद्वारे प्रसिद्ध झालेल्या जिया खानच्या अकस्मात मृत्यूमुळे एकच गोंधळ माजला होता. तिच्या निधनामुळे बॉलिवूड सेलिब्रिटीही शोकाकुल झाल होते. मृत्यूनंतर तिच्या घरातून एक पत्र मिळाले होते, त्यात अभिनेता सूरज पांचोली याचे नाव होते. याप्रकरणी त्याची बराच काळ चौकशीही सुरू होती.