असं घर तुम्ही कधीच पाहिलं नसेल! नितीन गडकरींच्या नागपुरातील आलिशान घराचे Inside फोटो पाहिलात का?

नितीन गडकरींच्या नागपुरातील नव्या पर्यावरणपूरक घराचे 'Inside' फोटो आले समोर; विज्ञानाचा वापर करून बनवलेल्या या आलिशान वाड्याची वैशिष्ट्ये पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

| Updated on: Feb 12, 2026 | 1:21 PM
1 / 10
आपल्या कामाच्या वेगवान शैलीसाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह एका नव्या घरात राहायला आले आहेत. नागपूरच्या महाल भागातील त्यांचा जुना गडकरी वाड्याचा त्यांनी पूर्ण कायपालट केला आहे.

2 / 10
सध्या गडकरी वाडा हा एका आधुनिक आणि पर्यावरणपूरक रूपात पुन्हा उभा राहिला आहे. नुकतंच नितीन गडकरींनी आपल्या संपूर्ण परिवारासह या घरात पूजा करून गृहप्रवेश केला. गडकरींचा हा नवा वाडा केवळ दिसायलाच सुंदर नाही, तर तो विज्ञानाचा एक उत्तम नमुना आहे.

3 / 10
नागपूरचा उन्हाळा खूप कडक असतो. त्यामुळे हे घर बांधताना विशेष 'हॉलो ब्रिक्स' वापरल्या आहेत. या विटांमुळे बाहेरची उष्णता घरात लवकर शिरत नाही, परिणामी उन्हाळ्यातही घर नैसर्गिकरीत्या थंड राहते.

4 / 10
पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या आणि ऊर्जा वाचवणाऱ्या या वास्तूला 'प्लॅटिनम रेटिंग' मिळाले आहे. नागपुरातील अशा प्रकारचे मानांकन मिळवणारे हे पहिलेच खाजगी घर ठरले आहे.

5 / 10
नितीन गडकरींच्या घराचा पुढचा भाग पाहिला तर आपल्याला कोकण किंवा केरळमधील टुमदार घरांची आठवण येते. त्यांच्या घराची रचना अशी आहे की ती हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात थंड राहील.

6 / 10
संघाच्या मुख्यालय परिसरात असलेल्या या वाड्याला राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. भाजपच्या विदर्भातील महत्त्वाच्या बैठका आणि राजकीय रणनीतींचे केंद्र म्हणून गडकरी वाड्याला ओळखले जाते.

7 / 10
नितीन गडकरींच्या नव्या घराच्या स्लॅबमध्ये विशेष पाइपलाइन टाकण्यात आल्या आहेत. उन्हाळ्यात या पाईप्समधून थंड पाणी वापरता येणार आहे. तर हिवाळ्यात गरम पाणी मिळणार आहे.

8 / 10
एसीचा वापर न करताही घरातील तापमान नैसर्गिकरीत्या सुमारे नियंत्रित ठेवण्यासाठी या घराची रचना मदत करणार आहे. गडकरींनी नेहमीच कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्यावर भर दिला आहे.

9 / 10
त्यांच्या या घरात भिंतींना गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगाचा (Cow Dung Paint) वापर करण्यात आला आहे. हा रंग पर्यावरणपूरक असण्यासोबतच घराला स्वदेशी लूक देतो.

10 / 10
या घरातील भागात आधुनिक सोयीसुविधा आहेत. जड लाकडी दरवाजे, पितळी दिवे आणि भारतीय कलाकुसर यामुळे या वाड्याला रॉयल लूक प्राप्त झाला आहे.तसेच जलसंधारणासाठी घरात रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रगत यंत्रणा बसवण्यात आली आहे.