नफा झाला तिप्पट…मग काय सुसाट सुटला हा नवरत्न कंपनीचा शेअर
Navratna Company Profit: या नवरत्न कंपनीच्या शेअरने पडत्या बाजारातही मोठी झेप घेतली. या कंपनीचा शेअर आज 18 टक्क्यांनी वधारला. या कंपनीच्या नफ्यात तिप्पट वाढ झाल्याचे समजताच शेअर गगनाला भिडला.

नवरत्न कंपनी NLC India ने नवीन विक्रम केला आहे. एनएलसी इंडियाचा शेअरने गुरुवारी उच्चांकी झेप घेतली. गुरुवारी BSE वर हा शेअर 18 टक्क्यांनी उसळला. हा शेअर 387.70 अंकांवर पोहचला. नवरत्न कंपनीच्या शेअरमध्ये सर्वात मोठी उसळी दिसली

गुरुवारी एनएलसी इंडियाचा शेअर गेल्या 5 वर्षांतील सर्वात उच्चांकावर पोहचला. एनएलसी इंडियाचा नफा 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या तिमाहीत जवळपास तिप्पट वाढला. या कंपनीच्या शेअरची निच्चांकी कामगिरी 220.25 रुपये इतकी आहे.

नवरत्न कंपनी एनएलसी इंडियाच्या फायदा चौथ्या तिमाहीत वार्षिक आधारावर 189 टक्के आहे. या मार्च महिन्याच्या संपलेल्या तिमाहीत कंपनीला 1394 कोटी रुपयांचा नफा आहे. एका वर्षापूर्वी समान कालावधीतील नफ्यापेक्षा यंदा कंपनीच्या नफ्यात तिप्पट वाढ झाली आहे. डिसेंबर 2025 च्या तिमाहीत कंपनीला 666 कोटींचा नफा झाला होता.

मार्च 2026 मध्ये तिमाहीत 5043 कोटी रुपये महसूल होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या महसूलात 32 टक्के वाढ झाली आहे. एक वर्षांपूर्वी या समान कालावधीत कंपनीचा महसूल हा 3836 कोटी रुपये इतका होता. तिमाही आधारावर कंपनीचा नफा 13 टक्क्यांनी वाढून 4443 कोटी रुपये इतका झाला आहे.

नवरत्न कंपनी एनएलसी इंडियाचा शेअर गेल्या 5 वर्षात 500 टक्क्यांहून अधिकने वधारला. एनएलसी इंडियाचा शेअर 14 मे 2021 रोजी 61.70 रुपयांवर होता. कंपनीचा शेअर 14 मे 2026 रोजी 387.70 रुपयांवर होता. गेल्या दोन वर्षांत कंपनीच्या शेअरमध्ये 70 टक्क्यांची उसळी आली आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.