
मेघालयची राजधानी शिलांगला उत्तर पूर्वमधील स्कॉटलंड म्हटले जाते. शिलांग पीक, लेडी हैदरी पार्क, कैलांग रॉक यासारखी अनेक पर्यटन स्थळे शिलांगमध्ये आहेत. या भागांत पर्यटनासाठी उन्हाळा सर्वात चांगले हंगाम आहे.

भारताचा ईशान्य भाग नैसर्गिक सौंदर्याने आणि पर्वत आणि धबधब्यांच्या सौंदर्याने परिपूर्ण आहे. घनदाट पर्वतांमध्ये सिक्कीमधील गंगटोक पर्यटकांना आकर्षित करते. गंगटोकमध्ये पर्यटनस्थळांसोबत प्राचीन मठ, मंदिर आणि महल आहे.

अरुणाचल प्रदेशातील तवांग पर्यटनासाठी सर्वोत्तम स्थळ आहे. तवांगचा अर्थ घोडा होतो. बौद्ध धर्मातील सहावे दलाई लामा यांनी हे स्थळ आपल्या मठासाठी निवडले होते. त्यासाठी त्यांना घोड्यांनी मदत केली होती. तेव्हापासून त्याचे नाव तवांग पडले. या ठिकणी जगप्रसिद्ध बौद्ध मठ आहे.

मेघालयतील चेरापुंजीचे नाव पावसाळ्यात अनेक वेळा ऐकले असणार आहे. सर्वाधिक पाऊस या ठिकाणी पडतो. त्यामुळे हे स्थळ पर्यटनासाठी सर्वात सुंदर आहे. या ठिकाणी असलेला नोहकालकाई धबधबा 1100 फूट उंच आहे.

सिक्किममधील दार्जिलिंगमध्ये डोंगर, दऱ्या आणि जंगल आहेत. या ठिकाणी असलेले चहाचे मळे जगभरात प्रसिद्ध आहेत. या भागात मोनेस्ट्री, बतासिया गार्डन, कंचनजंगा व्यू पॉइंट, महाकाल मंदिर, तेनजिंग रॉक, रोप वे पर्यटनासाठी आकर्षित करत असते.