आता घरबसल्या आधारशी ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करा, जाणून घ्या प्रक्रिया

| Updated on: Nov 16, 2021 | 8:43 PM

इतर कागदपत्रे आधार कार्डशी लिंक करणेदेखील खूप महत्त्वाचे आहे, मग ते पॅन कार्ड असो वा ड्रायव्हिंग लायसन्स असो. जर तुम्ही बाकीची कागदपत्रे आधार कार्डशी लिंक केली, तर त्यांच्याशी संबंधित सर्व काम सहज पूर्ण होईल. तुम्हालाही तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स आता आधार कार्डशी लिंक करायचा असेल तर ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोपी आहे. आता तुम्ही घरी बसूनही आधारशी DL लिंक करू शकता.

1 / 5
आधार कार्ड हे कोणत्याही भारतीय नागरिकासाठी आवश्यक कागदपत्र आहे आणि जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुमचे महत्त्वाचे काम अडकू शकते. पण इतर कागदपत्रे आधार कार्डशी लिंक करणेदेखील खूप महत्त्वाचे आहे, मग ते पॅन कार्ड असो वा ड्रायव्हिंग लायसन्स असो. जर तुम्ही बाकीची कागदपत्रे आधार कार्डशी लिंक केली, तर त्यांच्याशी संबंधित सर्व काम सहज पूर्ण होईल. तुम्हालाही तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स आता आधार कार्डशी लिंक करायचा असेल तर ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोपी आहे. आता तुम्ही घरी बसूनही आधारशी DL लिंक करू शकता.

2 / 5
टप्पा 1: तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स आधारशी लिंक करण्यासाठी प्रथम तुम्हाला राज्य परिवहन वेबसाईटला भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्ही आधार लिंकच्या पर्यायावर क्लिक करा आणि ड्रॉप-डाऊन मेनूमधून ड्रायव्हिंग लायसन्सचा पर्याय निवडा.

3 / 5
टप्पा 2: यानंतर तुम्हाला तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स (DL) नंबर टाकावा लागेल आणि Get Details चा पर्याय निवडावा लागेल. तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करताच त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.

4 / 5
टप्पा 3: यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती पुन्हा तपासावी लागेल आणि सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP पाठवला जाईल.

5 / 5
टप्पा 4: तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर OTP प्राप्त होताच, तो तेथे प्रविष्ट करा आणि तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डशी लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करा. जर तुम्ही तुमचा ड्रायव्हिंग लायसन्सही आधारशी लिंक केला असेल, तर तुम्हाला त्याच्याशी संबंधित काम करणे सोपे जाईल.