Plant Nurseries : 22 वर्षात रोपांची सगळ्यात कमी विक्री, अडचणीत आलेल्या नर्सरी चालकांनी…

Dhule Rain : महाराष्ट्रात यावर्षी जुलै महिन्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला, परंतु काही जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याचे धुळे जिल्ह्यातील नर्सरी चालक सांगत आहेत.

महेश घोलप | Updated on: Aug 18, 2023 | 12:00 PM
1 / 6
धुळे जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकरी आणि नर्सरी चालक अडचणीत सापडले आहेत. नर्सरी चालकांचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडला असल्याचं व्यापारी सांगत आहेत.

धुळे जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकरी आणि नर्सरी चालक अडचणीत सापडले आहेत. नर्सरी चालकांचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडला असल्याचं व्यापारी सांगत आहेत.

2 / 6

धुळ्यातील विद्या पाटील गेल्या 22 वर्षापासून जागा भाड्या घेऊन नर्सरीचा व्यवसाय करीत आहेत. गेल्या बावीस वर्षात एवढी कमी विक्री रोपांची कधी झाली नसल्याचं त्या सांगत आहेत.

3 / 6

विशेष म्हणजे पाऊस नसल्यामुळे फळांच्या रोपांची विक्री कमी झाली आहे. नर्सरीत फळांच्या झाडांबरोबरच विविध फुलांची आणि बागेत लावायची झाड आहेत.

4 / 6

यावर्षी पाऊस कमी असल्याने फळझाडांचे आणि फुल झाडांची विक्री झाली नसल्याची त्यांनी सांगितले. दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस असतो.

5 / 6

फळ, रोपे, फुलांची रोपे आणि विविध जातीच्या झाडांची रोपे विक्री होत असते. मात्र यावर्षी खूपच परिस्थिती वाईट आहे. नर्सरी चालकांचा खर्च निघेल की नाही, अशी बिकट स्थती आहे.

6 / 6

धुळे जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुध्दा चिंतेत आहेत. खरीप हंगाम वाया गेल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us