AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाहनांसाठी धोक्याची घंटा? मारुती, टाटा, महिंद्राच्या चाचणीत आढळलं काय? E20 पेट्रोलवर मोठा खुलासा

E20 Petrol Big News: ई-20 पेट्रोलवरून जनतेत मोठा रोष असल्याचे समोर आले आहे. वाहनांचे इंजिन, मायलेज घसरल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी आहे. आता तर एका नवीन अहवालाने अनेकांची झोपच उडणार आहे. या अहवालाने सरकारचा खोटारडेपणाच उघड केला आहे.

वाहनांसाठी धोक्याची घंटा? मारुती, टाटा, महिंद्राच्या चाचणीत आढळलं काय? E20 पेट्रोलवर मोठा खुलासा
E20 पेट्रोल चाचणीत मोठा खुलासाImage Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 13, 2026 | 8:27 PM
Share

E20 पेट्रोलवरून देशात वाहनधारकांमध्ये मोठी नाराजी आहे. वाहनांचे मायलेज आणि इंजिनवर त्याचा मोठा परिणाम होत असल्याची देशभर ओरड सुरू आहे. ई20 इंधनाचा परिणाम दुचाकी, चारचाकीच्या कार्यक्षमेतवर होत असल्याचा संताप समोर येत आहे. त्याचवेळी एक अहवालाने अनेकांची झोप उडवली आहे. त्यात प्रदूषण कमी होण्याचे, पेट्रोल स्वस्त होण्याचे सरकारचे दावे पार खोडून काढले आहेत. विशेष म्हणजे आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपन्यांनीच मोहिम हाती घेत चाचणी केली असता धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

त्या चाचणीत आढळले काय?

E20 पेट्रोलविषयी देशात मोठी ओरड सुरू आहे. त्यातच रॉयटर्सच्या एका वृत्तानुसार, मारुती, टाटा आणि महिंद्रा या आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपन्यांनी देशातील 21 राज्यांमधून E20 पेट्रोलचे 250 नमुने तपासले. यापैकी 18 राज्यांमधील पेट्रोलमधील क्लोराईडचे प्रमाण हे निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे वाहन खराब होत असल्याच्या दाव्याला बळकटी मिळाली आहे. वाहनाच्या लोखंडी भागावर त्याचा थेट परिणाम होण्याची दाट शक्यता असल्याने वाहनधारकांची चिंता वाढली आहे.

क्लोराईडचे प्रमाण कित्येक पटीने अधिक

क्लोराईडसाठी 3 PPM हे निर्धारीत मानक आहे. पण या चाचणीनुसार, महाराष्ट्र, राजस्थान आणि दिल्ली, नोएडा मध्ये हे प्रमाण मर्यादेपेक्षा कित्येक पटींनी अधिक आहे. रॉयटर्सने हे वृत्त संबंधित कंपन्यांमधील अंतर्गत ई-मेलच्या आधारे तयार केल्याचा दावा करण्यात येत आहे. कंपनी अधिकाऱ्यानुसार, 1 PPM पेक्षा जास्त क्लोराईडचे प्रमाण वाहनांसाठी नुकसानदायक ठरू शकते. याअगोदर पुरेशा प्रमाणात चाचण्या न घेतल्याने ऑटोमोबाईल कंपन्यांची संघटना SIAM ने ई 20 पेट्रोलवर सवाल विचारणारा अहवाल मागे घेतला होता. त्या आधारे केंद्र सरकारने 2000 पेक्षा अधिक नमुन्यांपैकी केवळ 2 ते 4 नमुन्यावर परिणाम झाल्याचा दावा करण्यात आला होता. आता जर ऑटोमोबाईल कंपन्यांमधील अंतर्गत ई-मेल आधारे रॉयटर्स वृत्तसंस्थेचा दावा खरा असेल तर वाहनधारकांची चिंता वाढणार आहे.

क्लोराईड अधिक असल्यास वाहनावर काय परिणाम?

E20 पेट्रोलमध्ये 20 पर्यंत इथेनॉल असते. क्लोराईड अधिक असेल तर इंधनाच्या संपर्कातील धातुचा भागाला गंज लागण्याची भीती आहे. यामुळे इंधन पंपाच्या कार्यक्षमतेवर मोठा परिणाम होऊ शकतो. फिल्टरमध्ये अडचण येऊ शकते. इंधनाच्या मार्गातील काही घटकांची झीज होऊ शकते. महागडी वाहन लवकरच दुरुस्तीस येऊ शकतात. वारंवार सर्व्हिसिंग करावी लागू शकते. काही भाग बदलावे लागू शकतात. पर्यायाने वाहनधारकावर अतिरिक्त खर्चाचा बोजा पडू शकतो.

Follow Us
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?