AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टाटा ग्रुपचा खरा मालक कोण ? कोठे खर्च होतो कमाईचा पैसा ?

टाटा ग्रुपचे स्ट्रक्चर अन्य फॅमिली बिझनसहून वेगळे आहे. टाटा ग्रुपचे मुख्य होल्डिंग कंपनी टाटा सन्सचा मोठा हिस्सा चॅरिटेबल ट्रस्टकडे आहे. ट्रस्टच्या उत्पनाला समाजाच्या भलाईसाठी खर्च केला जातो.

टाटा ग्रुपचा खरा मालक कोण ? कोठे खर्च होतो कमाईचा पैसा ?
ratan tata
| Updated on: Aug 13, 2026 | 8:42 PM
Share

टाटा समुहाला भारताचा सर्वात मोठा आणि विश्वासार्ह उद्योग समुह म्हणून मान मिळतो. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का की टाटा ग्रुपचा मालक एक व्यक्ती किंवा टाटा कुटुंबाचा कोणी सदस्य नाही. टाटा ग्रुपची मुख्य होल्डिंग कंपनी टाटा सन्स आहे. टाटा सन्समध्ये सर्वात मोठी हिस्सेदारी टाटा कुटुंबियांनी स्थापण केलेल्या अनेक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे सामाजिक काम करणाऱ्या ट्रस्टच्या जवळ आहे.

TOI च्या एका बातमीनुसार टाटा सन्सची सुमारे ६६ टक्के भागीदारी या चॅरिटेबल ट्रस्ट कडे आहे. हे ट्रस्ट शिक्षण, आरोग्य, रोजगार, उपजीविका आणि कला-संस्कृती यांसारख्या क्षेत्रांमध्ये काम करतात. म्हणजे टाटा परिवार या ग्रुपला थेट आपल्या नावावर चालवत नाही. त्याऐवजी कुटुंबांशी जोडलेले चॅरिटेबल ट्रस्ट टाटा सन्समध्ये मोठी हिस्सेदारी राखतात. हेच टाटा ग्रुपच्या मालकीच्या ढाच्याला दुसरे कौटुंबिक व्यावसायिकांपेक्षा वेगळे बनवते.

सर्वात मोठे शेअरधारक कोण ?

टाटा सन्सचे दोन सर्वात मोठे शेअरधारक आहेत सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट. दोन्ही ट्रस्ट मिळून टाटा सन्सची ५१.५४ टक्के भागीदारी सांभाळतात. ५१ टक्क्यांहून जास्त हिस्सेदारी असल्या कारणाने या दोन्ही ट्रस्टच्या जवळ टाटा सन्समध्ये स्पष्ट बहुमत आहे. या शिवाय टाटा कुटुंबाशी जोडलेले अन्य चॅरिटेबल ट्रस्ट देखील टाटा सन्समध्ये हिस्सेदारी राखतात. या सर्व ट्रस्ट मिळून एकूण हिस्सेदारी सुमारे ६६ टक्के होते. या ट्रस्टच्या जवळ असलेल्या शेअर कोणा एका व्यक्तीच्या खाजगी संपत्ती नाही. ट्रस्टच्या बोर्ड ऑफ ट्रस्टी याच्याशी जुळलेले निर्णय घेतात.

नोएल टाटा, टाटा सन्सचे मालक आहेत ?

हा प्रश्न देखील नेहमी विचारला जातो की टाटा ट्रस्टचे चेअरमन नोएल टाटा टाटा सन्सच्या शेअरचे मालक आहेत ? याचा उत्तर नाही ! नोएल टाटा व्यक्तीगतपणे त्या शेअरचे मालक नाहीत, जे चॅरिटेबल ट्रस्टच्या जवळ आहेत. हे शेअर संबंधित ट्रस्टच्या नावावर आहेत आणि याच्याशी जोडलेले निर्णय ट्रस्टचे बोर्ड ऑफ ट्रस्टी करतात. टाटा ट्रस्ट एक प्रकारचा मुख्य ढाचा आहे. ज्याच्या अंतर्गत टाटा कुटुंबाशी जोडलेले प्रमुख चॅरिटेबल ट्रस्ट काम करतात.

टाटा ग्रुपमध्ये टाटा सन्सची भूमिका काय ?

टाटा सन्स, टाटा ग्रुपच्या मधोमध असलेली मुख्य गुंतवणूक आणि होल्डिंग कंपनी आहे.तिला या ग्रुपची प्रमुख प्रमोटर कंपनी देखील म्हटले जाते. तिच्या अंतर्गत अनेक मोठ-मोठ्या कंपन्या वेगवेगळा व्यवसाय करतात. या कंपन्यांचे वेगवेगळे बोर्ड आणि मॅनेजमेंट असतात. म्हणजे टाटा ग्रुपची प्रत्येक कंपनीचा रोजचे दैनंदिन काम थेट कोणा एका टाटा कुटुंबाच्या सदस्यांद्वारे चालवले जात नाही.

आणखी एका ट्रस्टकडे आहेत शेअर

टाटा सन्सचे शेअर बाळगणाऱ्या ट्रस्टमध्ये एम. के. टाटा ट्रस्ट देखील सामील आहे. २०२४ च्या इन्कम टॅक्स अपिलेट ट्रिब्युनलच्या एका निर्णयानुसार या ट्रस्टच्या जवळ टाटा सन्सचे २,४२१ शेअर आहेत. हे शेअर १९५९ मध्ये ट्रस्ट स्थापन केल्याच्या वेळी त्याच्या सुरुवातीच्या संपत्ती म्हणजे कॉर्पस म्हणून ट्रस्टमध्ये ठेवले होते.

टाटा ग्रुपचे मॉडल अन्य कोटुंबिक व्यावसायिकांहून वेगळे

सर्वसाधारण कौटुंबिक बिझनस कुटुंबातील सदस्य स्वत:कंपनीच्या सर्वात मोठे शेअरधारक असतात.परंतू टाटा ग्रुपमध्ये असे नाही. येथे टाटा कुटुंबाशी जोडलेले चॅरिटेबल ट्रस्ट टाटा सन्समध्ये सर्वात मोठी हिस्सेदारी राखतात. या ट्रस्टमधून मिळणाऱ्या लाभाचा वापर शिक्षण, आरोग्य, उपजिविका आणि सामाजिक कल्याण अशा कामासाठी केला जातो.

त्यामुळे हे म्हणणे योग्य नाही की टाटा ग्रुपची संपूर्ण कंपनी कोणा एका टाटा कुटुंबाच्या सदस्याची खाजगी संपत्ती नाही. वास्तविक टाटा सन्सची कंट्रोलिंग हिस्सेदारी मुख्य रुपाने त्या चॅरिटेबल ट्रस्टच्या जवळ आहे , जे टाटा कुटुंबाशी जोडलेले आहेत. हेच कारण आहे की टाटा ग्रुपचा मालकी ढाचा भारताच्या अनेक उद्योजक परिवाराच्या पेक्षा वेगळा आणि खास मानला जातो.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...