
पंढपूरला मानाचे स्थान असलेल्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील श्री. संत मुक्ताबाई संस्थानातून संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपूर येथे विठूरायाच्या भेटीला निघाली आहे.

आज या दिंडीने विदर्भात प्रवेश केला. ऊन डोक्यावर घेऊन वारकरी संत मुक्ताबाईंच्या नामाचा जयघोष करीत टाळमृदंगाच्या गजरात भगव्या पताका घेऊन पंढरपूरकडे निघाले आहेत.

संत मुक्ताबाईंची पालखी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विआषाढी एकादशीनिमित्त विठूरायांच्या दर्शनासाठी राज्यभरातून येणार्या सात मानाच्या पालख्यांपैकी पहिला मान मुक्ताई पालखीला ठुरायाच्या भेटीला निघते. श्रीक्षेत्र मुक्ताईनगर ते श्रीक्षेत्र पंढरपूर दरम्यान निघणाऱ्या या वारीची अखंड परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे.

अवघ्या महाराष्ट्र्रात स्त्री संत म्हणून आदिशक्ती मुक्ताईंचा मान आहे. त्यामुळे आषाढी एकादशीनिमित्त विठूरायांच्या दर्शनासाठी राज्यभरातून येणार्या सात मानाच्या पालख्यांपैकी पहिला मान मुक्ताई पालखीला आहे.

दिंडी जळगाव जिल्ह्यातून बुलढाणा, जालना, बीडमार्गे सर्वाधिक किलोमीटरचा प्रवास करून सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे दाखल होत असते. त्यामुळे या दिंडीला अधिक महत्त्व आहे.