AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानतळ प्रवेशद्वार ते विमानात बसेपर्यंत काय घडलं? अजितदादांचे शेवटच्या प्रवासाचे CCTV फुटेज जाहीर करा; पक्षाच्याच नेत्याची मोठी मागणी

Ajit Pawar Death : बारामती विमानतळाजवळ झालेल्या अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. अशातच आता एका नेत्याने अजितदादांच्या शेवटच्या प्रवासाचे CCTV फुटेज जाहीर कराण्याची मागणी केली आहे.

विमानतळ प्रवेशद्वार ते विमानात बसेपर्यंत काय घडलं? अजितदादांचे शेवटच्या प्रवासाचे CCTV फुटेज जाहीर करा; पक्षाच्याच नेत्याची मोठी मागणी
Ajit pawar VideoImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 03, 2026 | 7:47 PM
Share

अजित पवार यांचे 28 जानेवारीला अपघाती निधन झाले. बारामती विमानतळाजवळ झालेल्या अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती, राज्य सरकारने 3 दिवसांचा दुखवटाही जाहीर केला होता. मात्र आता अजित पवार यांच्या विमान अपघातावर शंका उपस्थित केल्या जात आहेत. अनेक नेत्यांना या अपघाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अनेकांनी तर हा घातापात असल्याचीही शक्यता वर्तवली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजितदादांच्या शेवटच्या प्रवासाचे CCTV फुटेज जाहीर कराण्याची मागणी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अमोल मिटकरींची मोठी मागणी

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्वीट करत मोठी मागणी केली आहे. अमोल मिटकरी यांनी DGCA ने ब्लॅक बॉक्सचा सत्यपडताडणी अहवाल येण्याअगोदर आदरणीय अजित दादांचे दिनांक 28 जानेवारी 2026 चे मुंबई विमानतळ मुख्य प्रवेशद्वारापासून ते विमानात बसेपर्यंतचे सर्व व्हीडीओ शुटिंग व CCTV फुटेज तत्काळ अधिकृतरित्या तात्काळ प्रसिद्ध करावे अशी विनंती केली आहे. आता DGCA अमोस मिटकरींची ही विनंती मान्य करते हा हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अजित पवार यांनी मुंबई विमानतळावरून बारामतीसाठी सकाळी आठच्या आसपास उड्डाण केले होते. मात्र 8.45 च्या आसपास लँन्डिंगवेळी विमान क्रॅश झाले होते. विमानाने बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला होता, मात्र धुक्यामुळे पहिल्या प्रयत्नात अपयश आले होते. त्यानंतर दुसरा प्रयत्न करण्यात आला, मात्र या प्रयत्नात विमान धावपट्टीजवळ जमिनीवर आदळले होते. यानंतर विमान आणि विमानातील प्रवाशी जळून खाक झाले होते.

अमोल मिटकरींनी याआधीही शंका उपस्थित केली होती

अमोल मिटकरी यांनी आधीही या अपघातावर शंका उपस्थित केली होती. त्यांनी सोशल मीडियावर 5 प्रश्न उपस्थित केले होते. अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? सहावी व्यक्ती कुठे गेली? Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का? एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? असे प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केले होते.

Follow Us
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल