OTT वर आताच पाहून घ्या हे 5 चित्रपट; 29 दिवसांनंतर होणार डिलिट

बॉलिवूडमधील अनेक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्याच्या ठराविक दिवसांनंतर ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आणले जातात. ओटीटीवर प्रदर्शित झालेले असेच काही चित्रपट आता पुढील 29 दिवसांनंतर हटवले जाणार आहेत. हे चित्रपट ओटीटीवरून डिलिट केले जाणार आहेत.

| Updated on: Jul 02, 2025 | 3:30 PM
1 / 8
ओटीटीवर एखादा चित्रपट आपण कधीही पाहू शकतो, असं तुम्हाला वाटत असेल तर ऑगस्ट महिन्यात त्यापैकी काही चित्रपट ओटीटीवरून डिलिट केले जाणार आहेत. त्यामुळे त्याआधीच हे चित्रपट तुम्ही ओटीटीवर पाहून घेऊ शकतो.

2 / 8
अक्षय कुमारचा 'गब्बर इज बॅक' हा चित्रपट या यादीत समाविष्ट आहे. येत्या 1 ऑगस्टच्या आधीच तुम्ही नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहून घ्या. कारण त्यानंतर हा चित्रपट तिथून काढून टाकण्यात येणार आहे.

3 / 8
अजय देवगण आणि श्रिया सिरन यांच्या भूमिका असलेला 'दृश्यम' हा चित्रपट अनेकांच्या आवडीचा आहे. हा चित्रपटसुद्धा 1 ऑगस्टनंतर तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहता येणार नाही.

4 / 8
अभिनेत्री आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला 'राजी' हा सुपरहिट चित्रपट येत्या 5 ऑगस्टपर्यंतच ओटीटीवर उपलब्ध असेल. त्यानंतर तुम्ही अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट पाहू शकणार नाहीत.

5 / 8
अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या भूमिका असलेला '102 नॉट आऊट' हा चित्रपटसुद्धा तुम्ही 8 ऑगस्टच्या आधीच अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहून घ्या. कारण त्यानंतर तो त्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात येणार आहे.

6 / 8
अभिनेत्री कंगना राणौतची मुख्य भूमिका असलेला 'क्वीन' हा चित्रपट 2013 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तो नेटप्लिक्सवर स्ट्रीम झाला. परंतु हा चित्रपटसुद्धा 1 ऑगस्टपर्यंतच नेटफ्लिक्सवर उपलब्ध असेल.

7 / 8
कोणत्याही चित्रपटासाठी किंवा वेब सीरिजसाठी संबंधित ओटीटी प्लॅटफॉर्मला एका ठराविक वेळेपुरताच लायसन्स किंवा डिजिटल हक्क घ्यावे लागतात. लायसन्स संपताच तो चित्रपट ओटीटीवरून हटवावा लागतो.

8 / 8
त्यासोबतच चित्रपटाची मागणी कमी होताच किंवा नव्या कंटेंटसाठी जागा रिकामी करण्यासाठी किंवा निर्माते आणि डिस्ट्रिब्युटर यांच्यातील डील बदलल्यानंतर किंवा एखाद्या कायदेशीर बाबींमुळे ओटीटीवर तो कंटेंट हटवला जातो.