हनुमान चालिसा म्हणतच पहावी लागेल ही सीरिज, भयावह घटना; उडेल थरकाप

ही 8 एपिसोडची सीरिज हळूहळू रहस्य उलगडत नेते. त्यामुळे प्रत्येक भागानंतर पुढे काय होणार, याची उत्सुकता कायम राहते. हॉररसोबत सस्पेन्स आणि मानसिक संघर्ष यांचा मिलाफ या कथेला वेगळा रंग देतो.

| Updated on: Oct 01, 2026 | 9:30 AM
1 / 5
हॉरर आणि सायकॉलॉजिकल थ्रिलर या दोन्ही प्रकारच्या वेब सीरिज पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी ओटीटीवर अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, काही कथा केवळ भुतांच्या किंवा अलौकिक घटनांच्या आधारावर पुढे जात नाहीत, तर त्यामध्ये मानवी मनातील भीती, मानसिक संघर्ष आणि रहस्य यांचाही तितकाच प्रभावी वापर केला जातो.

हॉरर आणि सायकॉलॉजिकल थ्रिलर या दोन्ही प्रकारच्या वेब सीरिज पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी ओटीटीवर अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, काही कथा केवळ भुतांच्या किंवा अलौकिक घटनांच्या आधारावर पुढे जात नाहीत, तर त्यामध्ये मानवी मनातील भीती, मानसिक संघर्ष आणि रहस्य यांचाही तितकाच प्रभावी वापर केला जातो.

2 / 5

अशाच प्रकारची 8 एपिसोडची हॉरर-सायकॉलॉजिकल सीरिज प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतं आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज खूप लोकप्रिय आहे. ही सीरिज एका अशा डार्क कथेवर आधारित आहे, जी पाहताना तुमच्या अंगावर अक्षरश: काटा येईल. या सीरिजचं नाव आहे 'भ्रम'.

3 / 5

या वेब सीरिजची कथा अलिशा खन्ना (कल्की कोचलीन) या कादंबरीकाराभोवती फिरते. एका अपघातानंतर झालेल्या गर्भपातामुळे तिच्या मानसिक स्वास्थ्यावर मोठा परिणाम होतो. ती पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डरने त्रस्त आहे. याच अपघातात तिच्या पतीचा मृत्यू होतो.

4 / 5

या दु:खद घटनेनंतर ती तात्पुरती तिची बहीण अंकिता (भूमिका चावला) आणि मेहुणा पीटर (संजय सुरी) यांच्या घरी राहायला जाते. मात्र तिथे तिला अनेक भास होऊ लागतात. ती एका किशोरवयीन मुलीच्या बेपत्ता होण्याशी संबंधित प्रकरणाचा तपास करण्यासाठी निघते.

5 / 5

या सीरिजमध्ये अत्यंत रंजक वळणं पहायला मिळतात आणि पुढे उत्कंठा इतकी तीव्र होते की, काय घडणार या विचारानेच दचकायला होतं. ही वेब सीरिज के. हरी कुमार यांच्या 'द अदर साइड ऑफ हर' या कादंबरीवर आधारित आहे. यामध्ये कल्की कोचलीन, भूमिका चावला, संजय सुरी आणि एजाज खान यांच्या भूमिका आहेत. 'भ्रम' ही सीरिज झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या सीरिजचे आठ एपिसोड्स असून प्रत्येक एपिसोड फक्त 21 मिनिटांचा आहे. त्यामुळे तुम्ही ही सीरिज सहजपणे बिंच-वॉच करू शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us