
हॉटेल बुकिंग कंपनी OYO ने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने नवीन चेक-इन नियम लागू केला आहे. नवीन नियमानुसार, ओयो हॉटेलमध्ये अविवाहित जोडप्यांना आता रूम मिळणे अवघड होईल.

केवळ पती-पत्नीलाच हॉटेलमध्ये रूम देण्याचा नियम करण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक पुरावा दाखवावा लागेल. ऑनलाईन-ऑफलाईन बुकिंगासाठी हा नियम लागू करण्यात आला

जोडप्यांना आता मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा मागितल्या जाऊ शकते. अर्थात हा नियम संपूर्ण देशात अजून लागू करण्यात आला नाही. मेरठ येथे प्रायोगिक तत्वावर त्याची सुरुवात करण्यात आली आहे.

या नियमाविषयीच्या प्रतिक्रिया सुद्धा कंपनी घेत आहे. बुकिंगवेळी ग्राहकांना विहित प्रमाणपत्र अथवा पुरावा दाखवावा लागेल. कंपनीच्या या नवीन नियमांमुळे ओयो हॉटेलमध्ये जाणाऱ्या अविवाहित जोडप्यांना धक्का बसला आहे.

सामाजिक संवेदनशीलता, परंपरा याचा आदर म्हणून हा नियम लागू करण्यात येत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. मेरठसह इतर शहरात अनेक संघटना, व्यक्तींनी अविवाहित जोडप्यांना रूम देण्यास विरोध केला होता.

या नियमाचे अवलोकन करण्यात येत आहे. त्याची वेळोवेळी समीक्षा करण्यात येईल. भारतीय परंपरा आणि प्रथा तसेच व्यक्तिगत स्वातंत्र्य याचा कंपनी आदर करत असल्याचे ओयोचे म्हणणे आहे. सुरक्षित आणि कौटुंबिक वातावरणाला कंपनी प्राधान्य देते असल्याचे ओयोचे म्हणणे आहे.