पाकिस्तानने या बाबतीत भारताला टाकलं मागे, आत बाहेर सर्वकाही… थेट चीनच्या मदतीने…

Metro : भारतात अशी अनेक शहरे आहेत जिथे मेट्रो सेवा उपलब्ध आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही मेट्रो आहे, जी भारतातील मेट्रोपेक्षा थोडी वेगळी आहे. लाहोर मेट्रोबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बापू गायकवाड | Updated on: May 01, 2026 | 9:05 PM
1 / 5
पाकिस्तानमध्ये फक्त एका शहरातच मेट्रो चालते आणि ते शहर म्हणजे लाहोर. लाहोरमध्ये काही वर्षांपासून चीनच्या मदतीने धावत आहे. दिल्लीच्या तुलनेत येथे मेट्रो नेटवर्क खूपच मर्यादित आहे.

पाकिस्तानमध्ये फक्त एका शहरातच मेट्रो चालते आणि ते शहर म्हणजे लाहोर. लाहोरमध्ये काही वर्षांपासून चीनच्या मदतीने धावत आहे. दिल्लीच्या तुलनेत येथे मेट्रो नेटवर्क खूपच मर्यादित आहे.

2 / 5

लाहोरमध्ये 2020 साली मेट्रो सुरू झाली आणि सध्या फक्त एकाच लाईनवर (ऑरेंज)धावते. ही सुमारे 27 किलोमीटरच्या मार्गावर चालते. यातील सुमारे 26 किलोमीटर भाग उंच पुलावर (एलिवेटेड) आहे, तर सुमारे 1.7 किलोमीटर भाग भूमिगत आहे, ज्यामध्ये 2 अंडरग्राउंड स्टेशन आहेत.

3 / 5

दिल्लीमध्ये मेट्रोचा मोठा भाग भूमिगतही आहे. मात्र पाकिस्तानमधील या मेट्रोची खास गोष्ट म्हणजे ती पूर्णपणे ऑटोमॅटिक (ड्रायव्हरलेस) आहे. या बाबतीत पाकिस्तानने भारताला मागे टाकले आहे.

4 / 5

अनेक बाबतीत ही भारतातील मेट्रोसारखीच आहे. तिचा वेग ताशी सुमारे 80 किमीपर्यंत आहे. दिल्ली मेट्रोचा वेगही साधारण याच प्रमाणात आहे. ऑटोमेशनच्या बाबतीत भारतातील अनेक मेट्रो सेवा देखील प्रगत तंत्रज्ञान वापरतात.

5 / 5

पहिल्या नजरेत ही मेट्रो भारतातील मेट्रोसारखीच दिसते. आतून पाहिल्यावरही ती बऱ्याच अंशी भारतातील मेट्रोसारखीच वाटते. एक महत्त्वाचा फरक म्हणजे भारतात 'ट्रेन ऑपरेटर' मेट्रो चालवतो मात्र पाकिस्तानची मेट्रो ऑटोमॅटिक आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us