
युद्ध फक्त रणागणात लढलं जात नाही. कूटनितीक आघाडी सुद्धा महत्त्वाची असते. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या मनात युद्धाची भिती बसली आहे.

भारताने ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. ही गोष्ट पाकिस्तान कधी विसरणार नाही. त्यांच्याकडे अणवस्त्र असल्याचा भ्रम मोडून काढला.

भारत 36 तासात हल्ला करणार असं पाकिस्तानच्या सूचना मंत्र्यांनी वक्तव्य केलं. त्यावरुन पाकिस्तानात किती अस्वस्थतता आहे ते दिसून येतं.

आता पाकिस्तान कूटनितीचा आधार घेतोय. पाकिस्तान अमेरिका, चीन या देशांच समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पण तरीही त्यांना अपेक्षित मदत मिळत नाहीय.

आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यावर पाकिस्तानात बरीच टीका सुरु आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे जवळचे सहकारी आणि वरिष्ठ पत्रकार नजम सेठी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं.

अमेरिकेत भारताचा मोठा प्रभाव आहे. या प्रभावाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने त्यांच्या देशातील सुंदर महिलांचा आधार घेतला पाहिजे.

व्हिडिओमध्ये नजम सेठी बोलतात की, आपल्याला अमेरिकेत भारतीय लॉबीचा प्रभाव कमी करायचा असेल, तर आपल्याला तिथे सुंदर पाकिस्तानी महिला पाठवाव्या लागतील.

ज्या पबमध्ये जाऊ शकतात, अमेरिकन थिंक टँकमध्ये मिसळतील. आपलं सौंदर्य आणि ग्लॅमरने अमेरिकी थिंक टँकला प्रभावित करतील.

या वक्तव्यावरुन पाकिस्तानी सोशल मीडियावर नजम सेठी यांच्यावर बरीट टीका टिप्पणी सुरु आहे. हे वक्तव्य महिला सम्मानाच्या विरोधात आहे, असं अनेक युजर्सनी म्हटलं आहे.

तिथल्या युजर्सनुसार हे पाकिस्तानच कूटनितीक अपयश आहे. म्हणून पाकिस्तानला आता हे सर्व करण्याचा सल्ला दिला जात आहे.