
असे अनेक स्टार्स आहेत, ज्याचं खूप लहान वयात लग्न झालं. त्यातले अनेक कलाकार आज आनंदात जगत आहेत. काही नाती संपुष्टात आली आहेत. ज्या पाकिस्तानी अभिनेत्रीबद्दल बोलतोय, तिचं पहिलं लग्न 1997 साली सावत्र भावासोबत झालं. त्यासाठी अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

पाकिस्तानी फिल्ड इंडस्ट्रीतील ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने विवाहानंतर 13 वर्षांनी पहिल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2009 साली नवऱ्याला घटस्फोट दिला. वयाच्या 51 व्या वर्षी बिझनेसमॅनसोबत दुसरा निकाह केला. तिनेच सांगितलेलं की, मुलीच्या सासरकडचे माझ्या लग्नाला आलेले.

पाकिस्तानी अभिनेत्री जवेरिया अब्बासी बद्दल आपण बोलतोय. तिने स्वत:च्याच सावत्र भावासोबत लग्न केलं. जवेरियाच्या आईने ज्या व्यक्तीसोबत लग्न केलेलं, त्याना आधीपासून एक मुलगा होता. त्याचं नाव होतं शमून अब्बासी. जवेरिया अब्बासीने वयाच्या 17 व्या वर्षी निकाह केला. एका रिपोर्टनुसार कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी तिने हा निकाह केलेला.

जवेरिया अब्बासीला पहिल्या लग्नापासून एक मुलगी आहे. मुलीचं नाव Anzela आहे. ती सुद्धा अभिनेत्री आहे. Anzela च सुद्धा लग्न झालय. जवेरियाने दुसरा निकाह केला, त्यावेळी तिचा जवाई लग्नलाा हजर होता. मुलीच्या सासरकडचे सुद्धा आलेले.

जवेरिया अब्बासीने ज्याच्याशी दुसरं लग्न केलं तो बिझनेसमॅन आहे. तो आधी जवेरियाला ओळखत नव्हता. गुगलच्या माध्यमातून जवेरियाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जेवरियाच्या नवऱ्याला लोक हिंदू समजलेले. त्यावर तिने स्पष्टीकरण दिलेले. तिच्या दुसऱ्या नवऱ्याच नाव अदील आहे.