
फेमस पाकिस्तानी मॉडल आणि अभिनेत्री सहीफा जब्बारने वजन कमी करण्याची अशी एक पद्धत सांगितलीय, ज्यामुळे प्रत्येक जण हैराण आहे. एका इंटरव्यूमध्ये सहीफाने सांगितलं की, तिचा नवरा परदेशात असतो. त्यावेळी अनेकदा लोक मला विचारतात, तू एकटी कशी राहतेस.

त्यावर अभिनेत्री म्हणाली, "मी लोकांना सांगते की, मी घरी जाऊन आंघोळ करते, खाते आणि झोपून जाते. झोपण्यामध्ये मला एक वेगळं समाधान मिळतं" त्यावर मुलाखतकाराने तिला विचारलं की, तू जीममध्ये जात असशील?. त्यावर सहीफाने नाही, असं उत्तर दिलं. नाही, मला जीमची भिती वाटते, असं ती म्हणाली.

जेव्हा पण मी जीममध्ये जाण्याचा विचार करते, तेव्हा ट्रेनरला पैसे देते. दोन दिवस जाते, त्यानतंर जीमला जाणं बंद करते. त्यावर होस्टने तिला विचारलं, तू स्वत:ला फिट कसं ठेवलयस? त्यावर तिने उत्तर दिलं की, मी दु:ख आणि डिप्रेशन पचवून फिट झालीय.

अनेक लोक मला विचारतात की, तू इतकं वजन कसं कमी केलसं? त्यावर मी त्यांना हेच सांगते की, तुम्ही तुमच्या नवऱ्याला लॉन्ग डिस्टेंसवर पाठवा. जेव्हा तुम्हाला हे माहिती असेल की, तुम्ही तिथे जाऊ शकत नाही आणि तो कॅनडावरुन इथे येऊ शकत नाही, तेव्हा डिप्रेशनच येणार.

सहीफा पुढे म्हणाली की, वाईट नवरा असेल तर महिला म्हणतात, लांब आहे ते चांगलं आहे. पण नवरा चांगला असूनही लांब असतो, तेव्हा त्रास होतो. वजन कमी करण्यासाठी डिप्रेशनचा आधार घेण्याच्या अभिनेत्रीच्या वक्तव्यावर लोक तिला ट्रोल करतायत.