भारताचा शत्रू पाकिस्तानने देशातील या शहराला बनवली बँक?, ISI कडून असा होतोय वापर

भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव वाढलेला आहे. या दरम्यान पाकिस्तानबाबत राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तान भारतातील कोलकाता शहराचा वापर आर्थिक घेवाण-देवणासाठी करत आहे.

| Updated on: Jun 03, 2025 | 11:14 AM
1 / 5
भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला असताना एनआयएकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी एजंटांनी कोलकाता शहराला आपली बँक बनवली आहे. आयएसआयकडून दहशतवादासाठी आर्थिक घेवाण-देवाणसाठी कोलकाताला सेंटर म्हणून विकसित केले जात आहे.

2 / 5
एनआयएच्या माहितीनुसार, आयएसआय कोलकाताचा वापर स्लीपर सेल ऑपरेटीव्हसाठी करत आहे. सीआरपीएफ जवान मोतीराम जाट याला अटक केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. कोलकातामधील एका दुकानात मोतीरामसाठी पैसे पाठवण्यात आला होता.

3 / 5
मोतीराम जाट याच्या खात्यात त्या दुकानातून संशयास्पद व्यवहार झाले. 25 मार्च रोजी 22,000 रुपयांचा व्यवहार झाला. त्यानंतर 13,500, 15,000 आणि 5,000 रुपयांचा व्यवहार झाला. आता या व्यवहाराची तपासणी केली जात आहे.

4 / 5
मोतीराम जाट याला मिळालेला हा पैसा हेरगिरीसाठी आल्याचा संशय एनआयएला आहे. एका अधिकाऱ्याने म्हटले की, मोठा व्यवहार झाला असता तर संशय आला असता. यामुळे पाकिस्तानी हँडलर लहान, लहान रक्कम पाठवत आहे.

5 / 5
एनआयएने मोमीनपूरतील त्या दुकानतील सीसीटीव्ही फुटेज जमा केले आहे. आता त्याचा तपास केला जात आहे. एनआयएने एका हॉटेल कर्मचारी मोहम्मद वकील यालाही अटक केली. वकील आणि जाट यांच्यात ई-वॉलेटने आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय आहे.