
पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात स्वच्छता करण्यात आली. विठ्ठल मंदिराला पदस्पर्श व मुखदर्शनाची परंपरा आहे

आळंदीमधील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरामध्ये स्वछता करण्यात आली. दर्शनबारी, मंदिर परिसरात साफसफाईसह सॅनिटायझेशन करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षितेसाठी मंदिर दर तीन तासांनी अर्धा तासासाठी बंद ठेवण्यात येईल. याकाळात संपूर्ण मंदिराचे निर्जंतुकीकरणं करण्यात येणार आहे.

जेजुरीचं खंडोबा मंदिरही उद्यापासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर व्यवस्थापनानं खबरदारी घेत भाविकांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवल्या आहेत

जेजुरीचं खंडोबा मंदिरासह संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आले आहे.

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भक्तांना ऑनलाईन बुकींग करावी लागणार असून दररोज 4 हजार भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर संस्थानने केली आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे मंदिर उद्यापासून भक्तांना दर्शनासाठी खुली करण्यात येणार असुन त्या अनुषंगाने तुळजापूर येथील मंदिरात साफसफाई व तयारी करण्यात आली.

शिर्डीच्या साई मंदिरसंस्थानकडून सर्व भाविकांची थर्मल स्कॅनिग केली जाणार आहे. ठिकठिकाणी सॅनिटायझर स्टँड बसवण्यात आले आहेत.