
बॉलिवूड अभिनेता पंकज धीरच काल निधन झालं.पंकजने अनेक भूमिका साकारल्या. पण 1988 साली आलेल्या बी.आर चोपडा यांच्या महाभारत मालिकेतील त्यांची कर्णाची भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे.

पंकज धीर यांनी महाभारत मालिकेतील सूर्य पुत्र कर्णाची व्यक्तीरेखा साकारलेली. या पात्राने प्रेक्षकांवर एक वेगळी छाप उमटवली. पंकज धीर यांनी कर्णाच पात्र अमर केलं. आजही कर्ण हे नाव समोर येताच फक्त पंकज धीरच आठवतात.

गूफी पेंटल यांनी महाभारतात कौरवांचा मामा शकुनीची भूमिका अदा केलेली. ते महाभारत शो मध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून सुद्धा काम करत होते. त्यांनी बाकी सर्व कलाकारांना कास्ट केलेलं. गूफी यांनी वर्ष 2023 मध्ये जगाचा निरोप घेतला.

महाभारतात विदुरची भूमिका साकारणारा अभिनेता वीरेंद्र राजदान यांचं वर्ष 2003 मध्ये निधन झालं. त्यांनी ही भूमिका अमर केली.

प्रवीण कुमार सोबती यांनी महाभारतात पांडवांचा बलशाली भाऊ भीमाची व्यक्तीरेखा साकारलेली. प्रवीणची बॉडी आणि फिटनेसने या भूमिकेत प्राण फुंकले. प्रवीण यांचं वर्ष 2022 मध्ये निधन झालं.