
'पठाण' चित्रपटाच्या वादादरम्यान शाहरुख खानने कोलकात्यात पार पडलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. या कार्यक्रमात शाहरुखसोबत अमिताभ बच्चनसुद्धा दिसले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासुद्धा उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात शाहरुखने जया बच्चन यांच्या पायांना स्पर्श करत त्यांचा आशीर्वाद घेतला.

कार्यक्रमात ममता बॅनर्जी आणि शाहरुख हे बराच वेळ एकमेकांसोबत बोलताना दिसते. यादरम्यान कधी त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव तर कधी हास्य पहायला मिळालं.

ममता बॅनर्जी यांच्या आग्रहास्तव शाहरुख खानने बंगाली भाषेत आपल्या भाषणाची सुरुवात केली. माझं भाषण राणी मुखर्जीने लिहून दिलंय, असंही तो मस्करी म्हणाला. जर त्यात काही चुका आढळल्यास तर दोष राणीचाच असेल, असं म्हणत त्याने उपस्थितांना हसवलं.

या उद्घाटन सोहळ्याला महेश भट्ट, राणी मुखर्जी आणि कुमार सानू यांसारखे कलाकार उपस्थित होते.

राणी मुखर्जी आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची गळाभेट

ममता बॅनर्जी यांना पुस्तक भेट देताना शाहरुख खान..