PHOTO : महाजनादेश यात्रेचं बीड जिल्हयाच्या वेशीवर जोरदार स्वागत

| Updated on: Aug 26, 2019 | 7:54 PM

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यात ठिक-ठिकाणी यात्रेचं जोरदार स्वागत केलं.

1 / 6
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या महाजनादेश यात्रेवर आहेत. भाजपच्या महाजनादेश यात्रेचं सोमवारी (26 ऑगस्ट)बीड जिल्हयात आगमन झालं.

2 / 6
PHOTO : महाजनादेश यात्रेचं बीड जिल्हयाच्या वेशीवर जोरदार स्वागत

3 / 6
या दरम्यान आष्टी येथे सभा आयोजित करण्यात आली होती. नागरिकांनी या सभेला मोठी गर्दी केली. यावेळी पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादीच्या यात्रेवर निशाणा साधला. सत्ता असताना कांही केलं नाही, आता कसल्या यात्रा काढता? असा सवाल पंकजा मुंडेंनी उपस्थित केला.

4 / 6
बीडची माणसं गरीब असली तरी त्यांचं मन मोठं आहे. लोकनेते मुंडे साहेबांवर त्यांनी अतोनात प्रेम केले, त्यामुळेच भाजपला भरभरून यश मिळाले आहे. हे कदापि विसरून चालणार नाही. मुंडे साहेबांच्या पश्चात मी रडणार नाही, लढणार अशी शपथ घेतली होती, त्यादृष्टीने मी जनतेच्या भल्यासाठी काम करत आहे, त्यांचे नाव त्यामुळेच आज अजरामर झाले आहे.

5 / 6
बीड जिल्ह्याला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वॉटरग्रीड प्रकल्प मंजूर केला असून त्यासाठी चार हजार आठशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आष्टीला सुध्दा पाणी देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत आणि ते मिळणारच यात शंका नाही, असं आश्वासन पंकजा मुंडेंनी दिलं.

6 / 6
राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात पंकजा मुंडेंचं जाहीर कौतुक केलं. जी कामे आतापर्यंत कधीच झाली नव्हती ती आज पुर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पाच वर्षात 30 हजार किमी चे रस्ते पुर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. त्यातील 22 हजार किमीचे रस्ते पुर्ण झाले असून उर्वरित प्रगतीपथावर आहेत. देशातील कुठल्याही राज्याने हे केले नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.