
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या चित्रपटातील अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. प्रत्येक चित्रपटातून तापसीनं स्वत:ला सिध्द केलं आहे. तापसीचा आगामी चित्रपट ‘दोबारा’मधील तिचा लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय.

तापसी पन्नू आता ‘दोबारा’ या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांची मनं जिंकण्यासाठी तयार झाली आहे.

या चित्रपटाचं शूटिंग सध्या जोमात सुरू आहे. तापसी या सेटवरील अनेक फोटो चाहत्यांसाठी शेअर करतेय.

तापसीचा हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय.

सध्या तापसी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. एका पाठोपाठ 2 चित्रटांचं शूटिंग ती पूर्ण करत आहे.

आपल्या दमदार अभिनयानं ती नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. आता दोबारा या चित्रपटातून ती धमाल करणार दे नक्की आहे.