PHOTO : दादाला टाळी, खांद्याला खांदा, उमेदवारी जाहीर होताच तेजस-आदित्यची गळाभेट

| Updated on: Sep 30, 2019 | 6:45 PM

1 / 4
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे अखेर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. 'मी निवडणूक लढवणार', अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी वरळीतील शिवसैनिकांच्या मेळाव्यात केली.

2 / 4
आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढणार असल्याची घोषणा करताच त्यांचे छोटे बंधू तेजस ठाकरे यांनी मंचावर येऊन आदित्य यांची गळाभेट घेतली.

3 / 4
आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली, तेव्हा ठाकरे कुटुंबियांसह शिवसेनेचे नेतेही उपस्थित होते. खासदार संजय राऊत यांच्यासह व्यासपीठावरील सर्व नेत्यांनी आदित्य ठाकरेंना शुभेच्छा दिल्या.

4 / 4
ही माझ्यासाठी ऐतिहासिक झेप आहे. मी ही सुरुवात करत आहे, त्याआधी मी 10 वर्षांपासून महाराष्ट्र पिंजून काढला. आता निवडणूक लढवत आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे 2 किंवा 3 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याचं सांगितलं जात आहे.