
शास्त्रांमध्ये पितृ दोष अत्यंत धोकादायक मानला जातो. त्याच्या दुष्परिणामाने कुटुंबात नुकसान होऊ शकतं. जर कार्यात वारंवार बाधा येत असेल, मेहनत आणि ईमानदारीनंतरही यश मिळत नसेल तर ते पितृ दोषाचे लक्षण आहे, असं समजावं.

एखाद्या आकस्मिक दुर्घटनेचे शिकार झालात, किंवा अचानक एखादा आजार उद्भभवून पैसा बरबाद झाला तर पितृ दोष आहे असं समजा. तुमच्यासोबत असं काही होत असेल तर पितरांच्या शांतीसाठी दान आणि पुण्यदान करा.

घरात खटपटी सुरू असतील. पती-पत्नीतील वाद थांबत नसतील किंवा घरातील सदस्यांच्या दरम्यान वाद होत असतील तर घरातील या क्लेशाला पितृ दोष कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं.

पितृ पक्षाच्या आधी घरात अचानक झाड उगवणं, तुळस सुखणे हे अशुभ संकेत मानले जातात. या घटना पितरांची नाराजी दर्शवतात. त्यामुळे धन, सुख, समृद्धी आणि मुलांवर त्याचा वाईट परिणाम होतो.


हातात पैसा टिकत नसेल, कितीही बचत केली तरी काहीच उरत नसेल तर हा सुद्धा पितृ दोष आहे असं समजा. त्यासाठी आवश्यक त्या धार्मिक क्रिया पार पाडा.

पितरांची शांती करायची असेल आणि पितृ दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर ब्राह्मणांना भोजन द्यावं असं सांगितलं जातं. तसेच पंचबली भोग काढला पाहिजे. तसेच गरजवंतांना दान केलं पाहिजे.