
PM Kisan Latest Update : काही ठिकाणी पाऊस रेंगाळला असला तरी काही ठिकाणी पावसाने दमदार बॅटिंग केली आहे. त्यामुळे पेरण्यांना वेग आला आहे. शेतीच्या कामाची लगबग सुरू आहे. शेतकर्यांना आता पीएम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. पंतप्रधान किसान योजनेत (PM Kisan Yojana) 2000 रूपये मिळतात. बी-बियाणे, खतं, किटकनाशकांसाठी या रक्कमेचा त्यांना थोडा बहूत हातभार लागू शकतो.

पीएम किसानचा 20 वा हप्ता केव्हा? आज 23 जून आहे आणि शेतकऱ्यांना या योजनेच्या 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 रोजी मिळाला होता. तर काही वृत्तांनुसार, 20 वा हप्ता या महिन्याच्या अखेरीस जून 2025 मध्ये मिळू शकतो. म्हणजे 25 ते 30 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. अर्थात सरकारकडून याविषयीची कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

PM Kisan 2025 : पुढील 5 हप्ते मिळणार केव्हा? 20 वा हप्ता - जून 2025 च्या अखेरीस (20–30 जूनपर्यंत) 21 वा हप्ता - सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 (अगोदरच्या हप्त्यांच्या आधारावर) 22 वा हप्ता - जानेवारी 2026 (या योजनेच्या क्रमानुसार) 23 वा हप्ता - मे-जून 2026 (अगोदरच्या हप्त्याप्रमाणे) 24 वा हप्ता - सप्टेंबर 2026 (अंदाजित तारीख) नोट - या सर्व तारखा या आतापर्यंतच्या हप्त्यांच्या क्रमवारीतेनुसार आणि दोन हप्त्यांमधील अंदाजित अंतरानुसार आहे. या योजनेत साधारणपणे दोन हप्त्यात चार महिन्यांचे अंतर दिसून येते. ही सरकारची अधिकृत माहिती नाही.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता पात्र शेतकर्यांना मिळेल, ज्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत नसेल त्यांना फायदा होणार नाही. तुम्हाला फायदा होईल की नाही हे घर बसल्या तपासता येईल.

pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. शेतकरी कॉर्नर या पर्यायावर जा. लाभार्थ्यांच्या यादीवर जा. तुमचा आधार क्रमाक, खाते क्रमांक नोंदवा. "Get Data" वर क्लिक करा. पेमेंट स्टेट्स चेक करा.

ई-केवायसी पूर्ण झाला असेल तर लाभार्थ्याला रक्कम मिळण्यास अडचण येत नाही. खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. तरच खात्यात पैसा येईल.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता या दिवशी जमा होणार