
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या थायलंड दौऱ्यावर आहोत. दोन दिवसांच्या या दौऱ्यासाठी थायलंडमधील अधिकारी आणि तेथे असलेल्या भारतीय समुदायाने त्यांचे जोरदार स्वागत केले.

यानंतर पंतप्रधान मोदींनी थाय रामायणाचे विशेष प्रदर्शन पाहिले आणि ते पाहून खूप आनंद वाटल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी हे थायलंडमध्ये सहाव्या बिम्सटेक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आले आहेत. पंतप्रधान मोदींनीही थाय रामायणाची प्रसिद्ध कथा 'रामकियेन' वर आधारित एक उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम पाहिला.

हे पाहून पंतप्रधान मोदी खूपच प्रभावित झाले आणि त्यांनी आपली भावना व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींनी याबद्दल एक्सवर एक पोस्ट देखील केली. "भारत आणि थायलंड यांच्यात एक मजबूत सांस्कृतिक संबंध आहे, जो आपल्या लोकांमुळे अधिक दृढ होत आहे. हा संबंध येथे इतक्या प्रभावीपणे दिसून येत आहे, हे पाहून खूप आनंद झाला."

या कार्यक्रमादरम्यान थायलंडमधील विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम आणि थायलंडच्या पारंपरिक 'खोन' नृत्याचे मिश्रण करून 'रामकियेन' कथेवर आधारित एक विशेष सादरीकरण केले.

या कार्यक्रमादरम्यान थायलंडमधील विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम आणि थायलंडच्या पारंपरिक 'खोन' नृत्याचे मिश्रण करून 'रामकियेन' कथेवर आधारित एक विशेष सादरीकरण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंडमधील प्रमुख मंदिरांपैकी एक असलेल्या 'वाट फो'ला भेट देणार आहेत. हे मंदिर झुकलेल्या बुद्धीच्या विशालकाय मूर्तीसाठी जगभर प्रसिद्ध आहे.

पंतप्रधान मोदी बिम्सटेक शिखर परिषदेत थायलंड, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, म्यानमार आणि भूतानच्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधणार आहेत.