
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यासाठी स्टेजवर उपस्थित आहेत.

पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याची चर्चा होण्यामागे आणखी एक खास कारण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही या पुरस्कार सोहळ्यासाठी मंचावर पंतप्रधान मोदींसोबत उपस्थित आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांची मंचावर भेट घेतली. त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं.

या पुरस्कार सोहळ्यासाठी काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे सुद्धा मंचावर आहेत. मोदींनी त्यांची सुद्धा भेट घेतली.