Ration : भारतात 81 कोटी लोकांना मोफत रेशन; या सरकारी योजनेची वैशिष्ट्ये जाणून घ्या

PMGKAY Scheme : पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ही जगातील सर्वात मोठी अन्न सुरक्षा योजनांपैकी एक आहे. देशातील 81 कोटींहून अधिक लोकांना या योजनेचा फायदा होत आहे. काय आहे या योजनेची वैशिष्ट्ये?

| Updated on: Sep 06, 2025 | 3:08 PM
1 / 7
देशातील गरीब जनतेसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येतात. कोरोना काळात उपजिविकेची साधनं मर्यादीत झाली होती. दुकानं बंद होती. हाताला कामं नव्हती. रस्ते सुनसान झाली होती. तेव्हा या योजनेने अनेक कुटुंबांची अन्नाची भ्रांत संपवली.

2 / 7
रेशन योजनेला धरूनच पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली. ही योजना अजूनही सुरू आहे. या योजनेला आता 2029 पर्यंत केंद्र सरकारने मुदत वाढ दिली आहे. या योजनेतंर्गत रेशनकार्ड धारकाला 5 किलो गव्हासह तांदळाचे मोफत वाटप होते.

3 / 7
 पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ही जगातील सर्वात मोठी अन्न सुरक्षा योजनांपैकी एक आहे. देशातील 81 कोटींहून अधिक लोकांना या योजनेचा फायदा होत आहे.

4 / 7
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातंर्गत (NFSA) पात्र कुटुंबांतील प्रत्येक सदस्याला या योजनेतंर्गत दर महिन्याला 5 किलो मोफत अन्नधान्य मिळते. यामध्ये गहू आणि तांदळाचा समावेश आहे. ही योजना देशातील सरकारी स्वस्त धान्य दुकानातून राबवली जाते.

5 / 7
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. या योजनेत आर्थिक दुर्बल घटकांना मोफत खाद्यान्न देण्यात येते.

6 / 7
या योजनेसाठी लाभार्थ्याकडे AAY वा PHH हे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. आधारकार्डही दाखवणे आवश्यक आहे.

7 / 7
 जर तुम्हाला PMGKAY चा लाभ घ्यायचा अेल तर तुमचे रेशन कार्ड कोणत्या गटातील आहे ते एकदा तपासा. जिल्हा, तालुका अन्न आणि पुरवठा विभागाकडे अर्ज करा. रेशन दुकानदाराकडे चौकशी करा. अथवा सरकारची अधिकृत संकेतस्थळ dfpd.gov.in वर माहिती पाहा.